Relationship Tips  google
लाइफस्टाइल

Relationship Tips : नात्यात विश्वास कसा टिकवून ठेवाल ?

जोडीदाराला पुन्हा-पुन्हा शंका आली तर तुम्हीही नाराज होतात. अशा स्थितीत दोघांमधील भांडण वाढते.

नमिता धुरी

मुंबई : प्रेम आणि नात्यात विश्वास असणं खूप गरजेचं आहे. नाते टिकण्यासाठी जोडप्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे. जोडीदारावर कमी विश्वास किंवा शंका असताना नाते तुटण्याच्या मार्गावर येते.

अशा परिस्थितीत या नात्यासाठी लोकांनी आपल्या जोडीदाराच्या मनात विश्वास वाढवणे आवश्यक आहे. जेणेकरून नात्यात येणारी प्रत्येक अडचण दोघे मिळून सोडवू शकतील. विश्वासाच्या अभावामुळे जोडीदार अनेकदा त्यांच्या जोडीदारावर संशय घेऊ लागतात.

जोडीदाराला पुन्हा-पुन्हा शंका आली तर तुम्हीही नाराज होतात. अशा स्थितीत दोघांमधील भांडण वाढते. पण जोडीदाराची शंका दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच नातं घट्ट करण्यासाठी जोडीदाराचा स्वतःवरचा विश्वास वाढायला हवा. काही टिप्स अवलंबून तुम्ही नातेसंबंधातील जोडीदाराचा विश्वास मजबूत करू शकता. हेही वाचा - What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष ?’

संशयाचे कारण जाणून घ्या

जर जोडीदार तुमच्यावर वारंवार शंका घेत असेल तर त्याची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या संशयाचे कारण तुमच्याकडून नकळत झालेली काही चूक तर नाही ना. जोडीदारावर संशय घेण्याचे कारण जाणून घेऊन गैरसमज दूर करा आणि संशय वाढेल अशा चुका करणे टाळा.

नातेसंबंधाचे कारण स्पष्ट करा

तुम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये का आहात हे तुमच्या पार्टनरला समजावून सांगा. तुम्हा दोघांना एकमेकांबद्दल कसे वाटते ? जर जोडीदाराला तुमच्या भावना आणि प्रेम समजले तर त्यांचे हृदय आणि मन नातेसंबंधात स्पष्ट होईल आणि ते तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील.

तुमच्या जोडीदाराचा आदर करा

जोडीदाराचा आदर करा. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आदर करता. जर तुम्ही त्यांची काळजी घेतली तर ते तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील. जोडीदार तुमच्या भावना जाणण्यास सक्षम असेल. आदरावर आधारित नातं जास्त काळ टिकतं, तर ज्या नात्यात आदर नसतो तिथे प्रेमही संपतं.

तुमच्या जोडीदाराला निर्णयांमध्ये सहभागी करून घ्या

प्रेम आणि नात्यातील विश्वास वाढवण्यासाठी तुमच्या जोडीदाराला असे वाटू द्या की त्यांच्याशिवाय तुमचे आयुष्य अपूर्ण आहे. त्यांना तुमच्या निर्णयांमध्ये समाविष्ट करा. तुमच्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करा. अशा परिस्थितीत जोडीदाराला नात्याबद्दल सुरक्षित वाटेल.

एकटेपणा वाटू देऊ नका

जर तुम्ही जोडीदारासाठी वेळ काढला नाही तर त्याला नात्यात एकटेपणा जाणवू लागतो. त्यांना वाटते की कदाचित तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत नाही आणि तुमच्या आयुष्यात दुसरे कोणीतरी आहे. आपण त्याच्याशी कधीही ब्रेकअप करू शकता अशी त्याला शंका येऊ लागते. अशा परिस्थितीत जोडीदारासाठी वेळ काढा. त्यांच्या भावनांची काळजी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT