Marriage Tips esakal
लाइफस्टाइल

Couple Blood Group : लग्न करणाऱ्या मुला मुलीचा रक्तगट सारखाच असेल तर अडचणी येतात? समज की गैरसमज

लग्न करणाऱ्या जोडप्याचा रक्तगट सारखा असला तर काही अडचणी तर येणार नाही अशी भितीही अनेकांना असते. हा नेमका समज आहे की गैरसमज ते आपण जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

Tips Before Marriage : लग्न करण्याआधी आपले आईवडील बऱ्याच गोष्टींचा विचार करत असतात. मुला मुलींची कुंडली ते त्यांचा रक्तगट इथपासून मुला मुलींची चौकशी केली जाते. मात्र लग्न करणाऱ्या जोडप्याचा विशिष्ट रक्तगट असणे चांगले असे म्हटले जाते. तर लग्न करणाऱ्या जोडप्याचा रक्तगट सारखा असला तर काही अडचणी तर येणार नाही अशी भितीही अनेकांना असते. हा नेमका समज आहे की गैरसमज ते आपण जाणून घेऊया.

लग्न जुळवण्यापूर्वी रक्तगट पहिला जातो हे तर सर्वांनाच माहीत आहे, पण त्यामागील शास्त्रीय कारण सर्वांनाच माहीत असतेच असे नाही शिवाय याबाबत अनेकांच्या मनात खूप सारे गैरसमज देखील असतात.

सर्वात आधी आपण मानावी रक्तगटाबद्दल जाणून घेऊ. आपण सर्वांनाच माहीत आहे की एबीओ रक्तगट प्रणालीनुसार मानवी रक्तगटाचे ए, बी, एबी आणि ओ असे चार प्रकार आहेत शिवाय रक्तात आर एच घटक आहे की नाही यावरून हे रक्तगट परत पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह आशा प्रकारात मोडतात.

लग्नापूर्वी रक्तगटातील आरएच घटक तपासणे गरजेचे आहे. जर दोघांचेही रक्तगट पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह असतील तर कोणतीही समस्या नाही परंतु विशेषतः जर मुलीचा रक्तगट निगेटिव्ह असेल आणि मुलाचा रक्तगट पॉझिटिव्ह असेल तर ही गंभीर समस्य ठरते या परिस्थितीत जन्माला येणाऱ्या बाळाचा रक्तगट आरएच पॉझिटिव्ह असू शकतो व प्रसूती दरम्यान मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो, बाळाचे आणि मातेचे रक्त मिक्स होते तसेच इतर अनेक कठीण समस्या निर्माण होतात.

त्यामुळे लग्नापूर्वी रक्तगट तपासणे गरजेचे आहे. या मध्ये रक्तगटातील केवळ आर एच घटक म्हणजेच रक्तगट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे हे तपासणे गरजेचे आहे आणि विशेष म्हणजे मुलीचा रक्तगट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे तपासणे गरजेचे ठरते जर मुलीचा रक्तगट निगेटिव्ह असेल तर ही समस्या ठरते. जर दोघांचेही रक्तगट एकसारखे म्हणजेच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतील तर कोणतीही समस्या होत नाही.

त्यामुळे इथून पुढे लग्न जुळवताना पत्रिका जुळतात की नाही हे ओहण्याबरोबर रक्तात आरएच घटक आहे किंवा नाही म्हणजेच रक्तगट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे जरूर तपासून पहा जर दोघांचेही एकसारखे म्हणजेच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतील तर समस्या नाही पण मुलीचा रक्तगट निगेटिव्ह असेल तर ही समस्या ठरते.

डिस्क्लेमर - वरील लेख माहितीसाठी असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

टोलचे १०० रुपये वाचवायला शॉर्टकट घेतला, पण इंजिनिअरनं गमावला जीव; १५ दिवसांपूर्वी घेतलेली नवी कार

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी पीएमपीएम एलच्या १ हजार ५६ बसेस धावणार

बिग बॉस सीजन 3 विजेत्या विशाल निकमने शेअर केले खऱ्या सौंदर्यासोबत फोटो ! 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

Solapur Crime: बीड जिल्ह्यातील डॉक्टरास गर्भलिंगनिदान प्रकरणी अटक; बार्शीतील प्रकरण, तीनही संशयितांना पोलिस कोठडी!

SCROLL FOR NEXT