Kitchen Hacks  esakal
लाइफस्टाइल

Kitchen Hacks : फ्रिजच्या कोणत्या भागात दूध ठेवणं योग्य?

सामान्य तपमानाला दुध लवकर खराब होते

Pooja Karande-Kadam

Kitchen Hacks : उन्हाळ्यात फळे आणि भाज्या याव्यतिरिक्त असे बरेच पदार्थ आहेत जे काळजीपूर्वक साठवून ठेवले नाही तर ते लगेच खराब होतात. तसेच बर्‍याच वेळा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही भाज्या आणि दुध खराब होतात. अशावेळी फ्रिजमध्ये दुध ठेवताना काय काळजी घ्यावी याबद्दल आज आपण माहिती घेऊयात.

उष्णतेच्या लाटेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. संपूर्ण भारतभर उन्हाचा तडाखा बसला आहे. उष्णतेमुळे भूकही कमी होऊ लागते आणि फक्त थंडच पदार्थ प्यावेसे वाटते. या ऋतूमध्ये शिजवलेले अन्न, किंवा फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या नाहीत तर ते निरुपयोगी ठरते.

विशेषतः दुधाबद्दल बोलायचे झाले तर ते लवकर खराब होण्याची भीती असते. म्हणूनच आपण सर्वांनी हे पाहिलेच असेल की दूध काही वेळ उकळल्यानंतर ते थंड करून फ्रीजमध्ये ठेवले जाते. त्याचं कारण म्हणजे एवढ्या उष्णतेमध्ये दूध फ्रीजमध्ये ठेवलं नाही तर ते फुटतं.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की आपण सामान्य तपमानाला दुध लवकर खराब होते. म्हणूनच खूप गरम किंवा थंड दूध कधीही खराब होत नाही. अशा स्थितीत दुध खराब होण्यापासून रोखण्यासाठी, एकतर ते गरम ठेवा किंवा ते पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झालेलं दूध तुम्ही फ्रीजमध्ये कोणत्या भागात ठेवावं याची माहिती घेऊयात.

‘Eat this, Not that’ या लेखात USDA फूड सेफ्टी एक्सपर्ट मेरेडिथ कॅरोथर्स या संदर्भात काही सल्ला देतात. कॅरोथर्स म्हणतात की तुमच्या फ्रीजमधील भिन्न तापमानाचा अर्थ भिन्न गोष्टी आहेत. तुम्ही तुमच्या फ्रीजमधील तापमान मोजू शकत नाही, परंतु तुम्हाला हे माहित असले पाहिजे की दूध 4 अंश सेल्सिअसच्या खाली ठेवावे, जेणेकरून दूध खराब होणार नाही.

दुध कोणत्या कारणाने नासते

- जनावरांची धार काढल्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास जास्त वेळ लागणे.

- दुधाची भांडी स्वच्छ नसणे.

- धार काढणारी व्यक्ती स्वच्छ नसणे

- धार काढताना हात धुतलेले नसणे.

- धार काढणाऱ्या व्यक्तीला संसर्गजन्य रोगाची बाधा असल्यास.

- शिळे आणि ताजे दूध एकत्र केल्यास.

- दूध चांगले न उकळले गेल्यास

- फ्रिज अस्वच्छ असेल, बंद असेल

- फ्रिजमध्ये असलेले इतर पदार्थ खराब झाले असल्यास

- दुधात काही तिखट पदार्थ पडला असल्यास

दुधासाठी कोणता विभाग योग्य आहे?

फ्रीजमधील दूध त्या भागात ठेवावे जे फ्रीजचे सर्वात थंड क्षेत्र आहे. फ्रीजचा सर्वात थंड भाग हा वरचा भाग आहे. शीतलता वरच्या भागापासून सुरू होते. म्हणूनच नेहमी वरच्या भागात दूध ठेवणे सर्वात सुरक्षित मानले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

SCROLL FOR NEXT