Fruit Sakal
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: हो...चिरल्यानंतरही आपण फळे फ्रेश ठेवू शकतो

सुस्मिता वडतिले

बरेचजण ऑफिसमध्ये कापलेली फळे घेऊन जातात, परंतु सर्व फळे खाण्याच्या वेळी एकतर खराब होतात किंवा काळे पडतात.

काही फळे खाण्याची खरी मजा त्यांना कापून आणि सोलून खाण्यात आहे. अशा स्थितीत, बऱ्याच वेळा आपण एकत्र जास्त फळे कापतो, पण फळे कापून ठेवल्यावर ती लवकर खराब होतात आणि काळी पडतात. बरेचजण ऑफिसमध्ये कापलेली फळे घेऊन जातात, परंतु सर्व फळे खाण्याच्या वेळी एकतर खराब होतात किंवा काळे पडतात. म्हणूनच काही लोक टिफिनमध्ये फळे ठेवत नाहीत. जर तुम्ही सुद्धा या समस्येने त्रस्त असाल आणि कापलेली फळे जास्त काळ टिकवून ठेवायची असतील तर या गोष्टींची जरुर काळजी घ्या.

- कापलेली फळे 6 ते 8 तास ताजी ठेवण्यासाठी या फळांवर थोडा लिंबाचा रस टाकून फ्रिजमध्ये ठेवा. असे केल्याने फळांचा रंग पूर्वीसारखाच राहील आणि फळांची चवही राहील.

- जर तुम्हाला फ्रुट चाट बनवायचे असेल आणि फळे अगोदरच कापून ठेवायची असतील तर त्यासाठी सुरवातीला एका भांड्यात थंड पाणी घ्या. यानंतर कापलेली फळे एका भांड्यात ठेवा. असे केल्याने फळे काळी पडणार नाहीत आणि त्यांचा ताजेपणा टिकून राहील.

- सफरचंद कापल्यानंतर त्याचा रंग पिवळा आणि नंतर थोड्याच वेळात काळा होऊ लागतो. जर तुम्ही त्यात थोडा लिंबाचा रस घातला तर सफरचंदचा रंग बदलणार नाही आणि पटकन खराब होणार नाही.

- कापलेली फळे बऱ्याच वेळ साठवण्यासाठी, एका डब्ब्यामध्ये बर्फ ठेवा आणि थंड पाण्याने भरा. त्यानंतर त्यात चिरलेली फळे घाला. असे केल्याने फळ 3 ते 4 तास ताजे राहील आणि त्याचा रंग बदलणार नाही.

- जर तुम्हाला प्रवास करताना कुठेतरी कट केलेली फळे घ्यायची असतील तर त्यासाठी तुम्ही फळांवर सायट्रिक अॅसिड पावडर शिंपडा. असे केल्याने फळे जास्त वेळ ताजी राहतील आणि यामुळे फळांची चव आणि रंग सेम राहील.

- फळे कापल्यानंतर त्यांना प्लास्टिकच्या पिशवी किंवा अॅल्युमिनियम फॉइलमध्ये चांगले गुंडाळा आणि फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे कापलेली फळे जास्त वेळ खराब होणार नाहीत.

- स्ट्रॉबेरी लवकर खराब होते. जर तुम्हाला तो जास्त वेळ साठवायची असेल तर मोठ्या टिश्यू पेपरमध्ये ठेवा. असे केल्याने ते स्ट्रॉबेरीचा ओलावा शोषून घेईल आणि स्ट्रॉबेरी खराब होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT