Lata Mangeshkar lifestyle 
लाइफस्टाइल

९२ वर्षांच्या लता दीदींची कशी होती जीवनशैली?

कोरोनाची लागण होण्याआधी त्यांची तब्येत ठणठणीत होती. त्या अत्यंत साधे जीवन जगत होत्या

सकाळ डिजिटल टीम

गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाबरोबरच न्यूमोनियाची (pneumonia) लागण झाली होती. पण कोरोनाची लागण होण्याआधी त्यांची तब्येत ठणठणीत होती. त्या अत्यंत साधे जीवन (Lifestyle) जगत होत्या. माहितीनुसार लता यांना मासे आणि तिखट जेवण आवडायचे. पण वयानुरूप त्यांनी साधे जेवण (Food) जेवायला सुरूवात केली.

असा होता दिनक्रम

काही रिपोर्ट्सनुसार, रोज सकाळी 6 वाजता लता मंगेशकर उठायच्या आणि उठल्यानंतर थोड्या वेळात नाश्ता करायच्या. तब्येत चांगली राहावी यासाठी त्यांनी कोमट पाणी प्यायला सुरूवात केली होती. तर, दुपारच्या जेवणात (Food) आमटी, भाजी, पोळी असा साधा आहार त्या घ्यायच्याय तर रात्रीचे जेवण रात्री साडेनऊ वाजता करायच्या. रात्री आमटी-भात खाणे त्यांना जास्त आवडायचे.

वय वाढल्याने सोडले आवडते खाणे

माहितीनुसार लता यांना गुलाबजाम, दहीवडे, फिश करी, रव्याचा शिरा, खिमा समोसा, जिलबी आणि चिकन खाणे आवडायचे. पण वय वाढल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्वाचे असल्याने त्यांनी मसालेदार, आंबट आणि तेलकट पदार्थ खाणे कमी केले होते.

lata mangeshkar

रोज सकाळी गाण्याचा रियाज

या वयातही दीदी रोज गाण्याचा रियाज करायच्या. त्यांना स्टेज परफॉर्मन्सचे अनेक प्रस्ताव यायचे, पण त्या यासाठी तयार नसायच्या. त्याचा संपूर्ण दिवस सोफ्यावर बसणे आणि बेडरूममध्ये जात असे. खास लोकांशी त्या रोज फोनवर बोलून विविध गोष्टींवर चर्चा करायच्या. तसेच रोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ट्विट करायची त्यांना सवय होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एबी डिव्हिलियर्स, ऐकतोस ना! प्लीज मला मदत कर... सूर्यकुमार यादवची आफ्रिकेच्या दिग्गजाला विनंती; म्हणाला, माझं करियर वाचव..

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टची रंगली चर्चा; म्हणाली- शेवटचा दिवस....

SCROLL FOR NEXT