Know how and when to tell about Pregnancy here are some tips  
लाइफस्टाइल

तुम्हाला माहितीय प्रेग्नेंसी अनाउंस करण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे? जाणून घ्या 

सुस्मिता वडतिले

पुणे :  जेव्हा तुम्हाला समजले की तुम्ही प्रेग्नेंट (गर्भवती) आहात तेव्हा अचानक तुम्हाला असे वाटते की, सर्वकाही बदलले आहे. त्यावेळी तुम्ही आनंदी, दु: खी, घाबरलेले, उत्साही आहात की काय आहात हे अचूकपणे सांगणे अशक्य आहे. काही काळानंतर तुम्ही स्वीकारता की तुम्ही प्रेग्नेंट आहात. यानंतर ही आनंदाची  बातमी तुमच्या नातेवाईकांबरोबर शेयर करता. बर्‍याच स्त्रिया ही बातमी शेयर करताना खूप उत्साही असतात, तर काही केसेसमध्ये काळजी वाटत असते. या दोन्ही प्रकारच्या भावना सामान्य आहेत. प्रेग्नेंसीबद्दल प्रत्येकाला सांगण्याची किंवा प्रेग्नेंसी अनाउंस करण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती असावी हे आपण समजू शकत नसल्यास काही गोष्टी जाणून घ्या. 

सुरवातीला कुणाला सांगायचे 

तुमच्या प्रेग्नेंसीबद्दल ज्याला सुरवातीला माहित असावे तो म्हणजे तुमचा जीवनसाथी किंवा (नवरा). तुमच्या जोडीदारास हे सांगण्यासाठी तुम्हाला एक मार्ग शोधला पाहिजे. तुमच्या पतीस प्रेग्नेंसीबद्दल सांगण्याचे बरेच क्रिएटिव मार्ग आहेत. हे तुमच्या आयुष्यातील सर्वात स्पेशल दिवस असतो. तुम्ही तुमच्या पतीला मजेदार किंवा गंमतीदार पद्धतीने प्रेग्नेंसी असल्याचे सांगू शकता. तुमच्या पतीबरोबर ही बातमी शेयर केल्यानंतर तुम्हाला ही आनंदाची बातमी कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना सांगण्याची वेळ आलेली असते. तुमची आई, सासू, बहीण आणि जिवलग मित्र-मैत्रीण म्हणजेच पतीनंतर प्रेग्नेंसीबद्दल सांगणे देखील महत्वाचे असते, कारण ते आपली काळजी घेऊ लागतील. तुम्ही डॉक्टरांना सांगितले पाहिजे की या दिवसात काय करावे, काय करू नये परंतु आपल्या आयुष्यातील हे खास लोक आपल्याला प्रत्येक क्षणी हेल्दी प्रेग्नेंसी करण्यात मदत करत असतात.

बाकीच्या लोकांना सांगा 

ही आनंदाची बातमी कुणा-कुणाला शेयर करायची ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाची चॉइस आहे. तुमच्यासाठी हा एक अतिशय वैयक्तिक निर्णय आहे. काही परिवार किंवा लोक प्रेग्नेंसीबद्दल अगदी लवकर सांगतात. त्याचे काही फायदे आहेत, कारण तुम्हाला प्रेग्नेंसीच्या सुरुवातीच्या काळात सपोर्ट मिळणे सुरु होईल. तुम्हाला प्रेग्नेंसीशी संबंधित सल्ला देखील मिळायला सुरुवात होईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमधील सहकारी तुमची काळजी घेऊ लागतील. कामाचा दबाव किंवा ताण तुमच्यावर जास्त प्रमाणात ठेवला जाणार नाही. परंतु असे नाही की लवकरच प्रेग्नेंसीबद्दल सांगणे योग्य आहे. तुम्हाला अधिकाधिक सल्ला मिळण्यास सुरवात होईल. अशावेळी तुम्हाला सर्व सल्ल्याचे पालन करणे शक्य होणार नाही. कदाचित तुम्ही तुमच्या जवळच्या एका व्यक्तीस सांगितल तर ती व्यक्ती सर्वांना सांगेल. अशाप्रकारे तुमच्या प्रेग्नेंसीच्या बातमीची चर्चा होईल, मग तुम्हाला ती गोष्ट आवडणार नाही. सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की जर काही कारणास्तव तुम्हाला त्रास झाला तर त्यापासून मिसकैरेज होऊ शकतो. त्यावेळी तुमच्यासाठी या गोष्टी कठीण होऊन बसतात. तुम्ही प्रेग्नेंट आहात हे बर्‍याच जणांना माहित असल्याने सहानुभूती दाखविणाऱ्यांशी वागणे देखील भारी असू शकते.

बरेच दिवस प्रेग्नेंसीची बातमी लपविणे योग्य आहे का?

काही लोकांना प्रेग्नेंसीची बातमी जितक्या दिवस लपवता येईल तितकी लपवून ठेवायची असते. जोपर्यंत वाढलेले पोट दिसत नाही तोपर्यंत प्रेग्नेंसीबद्दल इतरांना सांगू नका. त्यामागे काही धार्मिक कारणे असू शकतात किंवा काही अपशकुन होण्याची भीती असू शकते. पण हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, त्यामध्ये काहीही बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. बऱ्याच दिवसांनंतर प्रेग्नेंसीच्या गोष्टी उघडकीस न आणण्याचे फायदे देखील आहेत, कारण प्रेग्नेंसीच्या दिवसात स्वतःला मानसिकरित्या तयार करण्यास मदत मिळते. लोकांच्या सल्ल्याचा भडिमार केला जात नाही, जे आपल्या मनाने निर्णय घेणे आपल्यास सोपे बनते. जर दुर्दैवाने तुमचे नंतर मिस कॅरेज झाल्यास तुम्हाला बर्‍याच लोकांना सांगण्याची किंवा त्यांच्याबद्दलचे दुःख व्यक्त करण्याची गरज पडत नाही. प्रेग्नेंसीची बातमी लपवण्याचा सर्वात मोठा साइड इफ़ेक्ट (दुष्परिणाम) हा आहे की, तुम्ही या दिवसात लोकांचा सपोर्ट (पाठिंबा) मिळवू शकणार नाही. भविष्यात प्रेग्नेंसीत काही कॉम्प्लिकेशन्स झाल्यामुळे मिस कॅरेज कारणीभूत ठरू शकतो आणि तुम्ही नैराश्यात बुडत असाल तर तुम्ही दु: खी का आहात हे लोकांना कळणार नाही. ते तुम्हाला तुमच्या संकटातून बाहेर काढण्यात मदत करणार नाही.

वरील या गोष्टी सांगण्याचे तात्पर्य म्हणजे प्रेग्नेंसी अनाउंस करण्याचे कोणतेही परफ़ेक्ट फ़ॉर्मूला नसतो. तुमच्या सोयीसाठी आणि कुटुंबाला विचारून हा निर्णय घ्या. अशा दिवसात तुम्ही निरोगी आणि आनंदी रहावे ही आमची इच्छा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT