Makar Sankranti Fashion esakal
लाइफस्टाइल

Makar Sankranti Fashion : संक्रांतीसाठी ही मेन्स फॅशन आहे ट्रेंडींग.. अशी करा स्टाईल..

मकर संक्रांत पूर्ण भारतात वेगवेगळ्या नावाने पण तितक्याच जल्लोषात साजरा होणारा सण

सकाळ डिजिटल टीम

Makar Sankranti Fashion : मकर संक्रांत पूर्ण भारतात वेगवेगळ्या नावाने पण तितक्याच जल्लोषात साजरा होणारा सण आहे; हा सण शेतीच्या दृष्टीने महत्वाचा असतो, कारण आता ऊस, हरभरा अशा गोष्टींच्या कापणीची प्रक्रिया सुरू होईल. उत्तर भारतात संक्रांतीला पोंगल म्हणतात, इतर ठिकाणी भारतात याला मकर संक्रांतीच म्हणतात, महाराष्ट्रात मात्र याला फक्त संक्रांतच म्हणतात.

या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याला प्राधान्य दिलं जातं.. सगळे लोकं काळ्या रंगाचे कपडे घालत असतात, बायकांचा तर वेगळाच उत्साह असतो पण पुरुषांनी नक्की काय स्टाइल करावी हा प्रश्न असतोच; तुम्ही ह्या पद्धतीचे कपडे घेऊ शकतात.

१. मोदी जॅकेट

नवीन लग्न झालं असेल किंवा छान तयार व्हायची इच्छा असेल तर मोदी जॅकेट आणि पॅंटच कॉम्बिनेशन छान दिसेल. तुम्ही आतमध्ये वेगळा कुर्ता आणि वरती काळं मोदी जॅकेट असंही कॉम्बिनेशन सुद्धा करू शकतात. प्लेन पेक्षा फ्लोरल प्रिंटच मोदी जॅकेट सुंदर दिसेल.

२. कुर्ता

सध्या कुर्त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आले आहेत, अंगरखा पॅटर्न जो आधी फक्त शेरवानी मध्ये येत होता आता तो कुर्त्यांमध्ये सुद्धा आलेला आहे. यावरती राजस्थानी स्टाइल किंवा मंडाला आर्टची डिझाईन सुद्धा आलेली आहे. शिवाय रेग्युलर डिझाईन सुद्धा उठून दिसतात.

३. शॉर्ट कुर्ता

थोडा इंडोवेस्टर्न लुक हवा आहे, किंवा तेच तेच लॉन्ग कुर्ते घालून कंटाळा आला आहे तर शॉर्ट कुर्ता बेस्ट आहे; शिवाय तुम्ही हे कुर्तेनंतरही छोट्या मोठ्या पार्टींना सुद्धा वापरता येतील.

४. कॅज्यूअल शर्ट

ऑफिसमध्ये संक्रांत साजरी करता आहात? मग तिथे खूप छान असे कुर्ते नाही घालता येणार, त्या[पेक्षा तुम्ही असे कॅज्यूअल शर्ट घेऊ शकतात. मुलांवर तसेही काळे कपडे सुंदर दिसतात, त्यामुळे तुम्ही हे शर्ट कधीही वापरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT