Dream esakal
लाइफस्टाइल

Dream : तुम्हाला लग्नाचे स्वप्न पडत असेल तर वेळीच जागे व्हा, शुभ-अशुभ जाणून घ्या

स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा स्वतःचा अर्थ असतो. लग्नाचे स्वप्न पाहणे शुभ असते की अशुभ; जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Dream : काही झोपेत स्वप्न पाहतात काही जागेपणी. जागेपणी बघितलेले स्वप्न माणसाच्या आयुष्याला ध्येय देते असे म्हणतात. पण झोपेतल्या स्वप्नांनाही अर्थ असतो. असे म्हणतात की स्वप्ने आपल्याला भविष्यातील घटनांकडे निर्देशित करतात.

त्याचबरोबर काही स्वप्ने पाहून आपल्याला आनंद होतो, तर काही स्वप्ने पाहून आपण घाबरून जातो. खरं तर, हे आवश्यक नाही की आपण पाहिलेल्या स्वप्नाचा अर्थ वास्तविक जीवनातही असेल. स्वप्नात आपले स्वतःचे लग्न पाहिल्यास याचा अर्थ काय होतो. चला जाणून घेऊया.

लग्नाचे स्वप्न पाहणे

तुम्ही अविवाहित असाल आणि तुमच्या मनात लग्नाचं स्वप्न येत असेल. तर हे एक शुभ चिन्ह आहे असे मानण्यात येते आणि याचा अर्थ असा आहे की आपण नातेसंबंध, व्यवसायात वचनबद्धता देणार आहात.

जोडीदारासोबत लग्नाचे स्वप्न पाहणे

स्वप्न शास्त्रानुसार लव्ह पार्टनरसोबत लग्नाचे स्वप्न पडले तर ते शुभ संकेत आहे. तसेच याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या नात्याचे लग्नात रूपांतर करणार आहात. तसेच, जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तर तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.

लग्नाच्या तयारीची स्वप्ने

जर तुम्हाला लग्नाच्या तयारीची स्वप्ने पडत असतील तर ते चांगले लक्षण नाही असे सांगितले आहे. म्हणजे येत्या काही दिवसांत तुम्हाला मानसिक चिंता वाटू शकते. तणावही असू शकतो. किंवा तुम्हाला करिअर आणि व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते.

दुसऱ्याशी लग्नाचे स्वप्न

जर तुम्ही तुमच्या प्रेमी जोडीदाराशिवाय इतर कोणाशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत असाल तर याचा अर्थ तुमचे सध्याच्या नात्यात फारसे समाधानी नाही आहात. तसेच, ज्याच्यासोबत तुम्ही स्वप्न पाहिले आहे त्याच्याशी तुमची मानसिकता जुळते आहे. म्हणूनच तुम्हाला त्याच्याशी लग्न करायचे आहे.

लग्न मंडप आणि नृत्य

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात लग्न मोडणे हे चांगले स्वप्न मानले जात नाही. स्वप्नात लग्न मोडणे म्हणजे तुमच्या कामात व्यत्यय येईल असे दर्शीवण्यात येते. तुमच्या स्वप्नात लग्नाचा मंडप पाहणे म्हणजे तुमच्या घरात काही शुभ कार्य होणार आहे. स्वप्नात लग्नात नाचणे हे एक चांगले स्वप्न आहे. स्वप्नात लग्नात नाचणे म्हणजे तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: हजारो कोटींचा खर्च, सरकार बदललं, प्रकल्प आले... तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली का जाते? नेमकं चुकतंय कुठे? जाणून घ्या...

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

Crime News: दोन महिन्यांआधी प्रेमविवाह; सासरी येताच नवविवाहित तरुणी १४ वर्षीय दिरासोबत पळाली, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Atrocities Act: ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा: मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, अधिक गुन्ह्यांच्या जिल्ह्यांत जलदगती न्यायालये उभारा

Gujarat ATS: गुजरातमध्ये जैशचा कट उधळला! एटीएसकडून आठ संशयित दहशतवाद्यांना अटक; मॉड्यूल उभारण्याचा संशय

SCROLL FOR NEXT