लाइफस्टाइल

Marriage Tips : लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोला कसं करावं खूश? जाणून घ्या टिप्स

सर्व गोष्टी सुरळीत होण्यासाठी शारिरीक संबंध म्हणजेच सेक्स देखील महत्त्वाचे असते.

सकाळ डिजिटल टीम

Marriage Tips : लग्नानंतर पती-पत्नी एकत्र राहण्यास सुरुवात करतात. त्यानंतर त्यांना एकमेकांची सवय लागते. ओढ, प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आतुरता अशा सर्व गोष्टी नात्यात येतात. मात्र, या सर्व गोष्टी सुरळीत होण्यासाठी शारिरीक संबंध म्हणजेच सेक्स देखील महत्त्वाचे असते.

जेवढे तुम्ही तुमच्या पार्टनरला समजून घ्याल तितके तुमचे नाते घट्ट होते. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना नेमके काय हवे असते, त्यांना खूश कसे कराल, हे जाणून घ्या.

पहिल्या रात्री या गोष्टी करा

  • गिफ्ट द्या

तुमच्या जोडीदाराशी संवाद करण्यापूर्वी तिला एखादे गिफ्ट द्या. यामध्ये तुम्ही सुगंधी फुले, गजरा, ड्रेस किंवा साडी देऊ शकता.

  • संवाद साधावा

दोघांनाही एकमेकांना समजून घेणे फारच गरजेचे असते. याकरता दोघांमध्ये संवाद होणे गरजेचे असते. मुलीला सुरुवातीला आपला नवरा हा एकच आपला हक्काचा व्यक्ती वाटत असतो. ती त्याच्यात पती ऐवजी आपला मित्र मिळेल, अशी तिची अपेक्षा करते. त्यामुळे संवाद साधावा.

  • भावनिक जवळीक करा

तिला आपलेसे करा. तिची काळजी घ्या. सतत तिला काय हवे, नको याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. यामुळे तिच्या मनात तुमच्याविषयी एक वेगळीच भावना निर्माण होते. आणि तिला आपला नवरा काळजी घेतो हे पाहून फार बरे वाटते.

  • कौतुक करा

तिच्या मनातील भिती काढून टाकण्यासाठी तिच्याशी दिलखुलास गप्पा मारा. तिचे कौतुक करा. ती किती सुंदर आणि सर्वगुणसंपन्न आहे हे दाखवून द्या. यामुळे मुलीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, आणि ती तुमची कधी नकळत होऊन जाईल हे तुम्हालाही कळणार नाही.

  • आवडी-निवडी जाणून घ्या

गप्पा मारत असताना दोघांनीही एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घ्या. आपल्या पत्नीला काय आवडते? काय आवडत नाही या गोष्टींची माहिती जाणून घ्या. यामुळे तुमच्या नात्यात अधिक जवळीकता येण्यास मदत होईल.

  • सेक्सची घाई नको

सर्वप्रथम तुमच्या पार्टनरला विश्वासात घ्या. स्वप्न रंगवा. तुम्ही तिची आयुष्यभर साथ देणार असा विश्वास द्या. सेक्सची घाई करू नका.

  • सौम्य फोरप्ले

तुमचा पार्टनर तयार आहे का याचा अंदाज घ्या आणि त्यानंतर पुढे जा. कारण लग्नाच्या पहिल्या रात्री पुरुषाला सेक्स करण्याची इच्छा असते. मात्र, त्याआधी तुम्ही तुमच्या जोडीदाराची परवानगी घ्या. याकरता आधी तिला प्रेमाने जवळ घेऊन तिला अलगद स्पर्श करा. सुरुवातीला फोरप्लेने सुरुवात करा आणि तिला खूश करा. मात्र, तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करु नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT