Navratri 2023  esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : नरसोबावाडीची बासुंदी जगात भारी; सुधा मूर्ती सुद्धा आहेत फॅन, अशी आहे रेसिपी

वाडीतल्या बासुंदीचा विषयच वेगळा, अशी चव शोधूनही सापडणार नाही

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : जगात भारी कोल्हापुरी असं म्हणतात ते काही उगीच नाही. नरसोबावाडीला गेलं की दत्त गुरूंचे दर्शन घ्यायचं आणि बाहेरच असलेल्या दुकानांतून बासुंदी पिऊन घरी यायचं हा अनेकांचा नित्यक्रम आहे. याच आपल्या बासुंदीच्या प्रेमात शेफ रणबीर आणि सुधा मुर्तीजी सुद्धा आहेत.

होय तुम्ही बरोबर ऐकलेत. एका Food Vlogger ने बनवलेल्या व्हिडिओत सुधा मूर्ती आणि शेफ रणबीर आपल्या नरसोबावाडीच्या बासुंदीच कौतुक करताना दिसत आहेत. रणबीर तर म्हणतो की, वाडीच्या बासुंदी पेक्षा चांगली बासुंदी त्यानं आजवर खाल्ली नाही.

तर सुधा मुर्तीजींनाही जेव्हा विचारण्यात आलं की, तुमची फेव्हरेट फूड कोणते, तेव्हा त्या कोल्हापुरची बासुंदी सगळ्यात जास्त आवडते असे सांगायला विसरल्या नाहीत.

नृसिंहवाडी सारखी बासुंदी जगात कुठेच बनत नाही, याचे कारण म्हणजे वाडीतील दुधाची गुणवत्ता, त्यासाठी आवश्यक म्हैशीच्या चाऱ्याची गुणवत्ता तेथील कृष्णा नदी काठची शेती, व पाणी सर्वांचा परिणाम म्हणून ती बासुंदी चवदार होते असे तिथले नागरिक सांगतात.

ही बासुंदी घरीच कशी बनवायची हे पाहुयात.

२ लिटर फुल क्रिम दूध, १/३ कप साखर, २ टेबलस्पून दुध मसाला आणि १ टेबलस्पून केसर

बासुंदी बनवण्याची कृती

दुध गरम करत ठेवावे आणि एक उकळी येऊ पर्यंत गॅस मोठाच ठेवावा. एकदा उकळी आली की गॅस मंद आचेवर ठेवावा. दुधात पळी ठेऊन दुध आटवायला ठेवावे. दुध एकसारखे हलवत रहावे,म्हणजे खाली तळाला दुध लागणार नाही.

साधारण 1/4 लिटर दुध आटले की त्याचा रंग बदलतो. तेव्हा दुधात साखर घालावी. गॅस मंद आचेवर ठेवावा. दुध चांगले शिजायला सुरवात होते. दुधाला घट्टपणा यायला लागतो. मग यात केसर & दुध मसाला घालून दूध अजून थोडा वेळ शिजवून घ्यावे.

दुधाला एकसारखा दाटपणा येतो. गॅस बंद करून बासुंदी थंड करायला ठेवावी. खायला देताना वरून काजू, बदाम पिस्त्याचे अगदी बारीक काप तुम्ही त्यावर घालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT