Bollywood actresses Sakal
लाइफस्टाइल

Navratri 2023: नवरात्रीत साडी कोणती नेसायची? कसा लूक करायचा, या प्रश्नांची उत्तरे आता बॉलिवूड अभिनेत्रीच देतील

यंदाच्या उत्सवात 'हे' लूक्स कराल तर अभिनेत्रींपेक्षाही सुंदर दिसाल!

वैष्णवी कारंजकर

अश्विन महिन्यातला शारदीय नवरात्रौत्सव येत्या काही दिवसांतच सुरू होणार आहे. त्यामुळे आता लोक बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. मंदिरे आणि मंडपही सजू लागले आहेत. या काळात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. धार्मिक स्थळी छान आवरुन तयार होऊन पूजा-अर्चना करण्यासाठी सर्वजण जातात.

आता जिथे नटण्या-सजण्याचा मुद्दा येतो, तिथे फॅशनही येतेच. आता पूजेसाठी आवरुन जायचं म्हणजे कोणती साडी नेसायची, कोणता ड्रेस घालायचा हा प्रश्न स्त्रियांपुढे उभा राहतोच. जर तुम्हाला साडी नेसण्याची आवड असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. कोणत्या प्रकारच्या साड्या नेसायच्या, कसा लूक करायचा, या तुमच्या प्रश्नांची उत्तरं या बॉलिवूड अभिनेत्री नक्कीच देतील.

बॉलिवूडच्या काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या नेहमी सुंदर साड्या परिधान करतात. त्यांचे लूक्स पाहून तुम्ही तुमची स्वतःची स्टाईलही तयार करू शकतात. कोण आहेत या अभिनेत्री, कशी आहे त्यांची स्टाईल, जाणून घ्या...

विद्या बालन

तुम्हीही अभिनेत्री विद्या बालन प्रमाणे नवरात्रीमध्ये कांजीवरम सिल्क साडी नेसू शकता. विद्या बालनने राणी रंगाची साडी नेसली असून त्यावर जांभळ्या रंगाचा सोनेरी काठ असलेला ब्लाऊज परिधान केला होता. याशिवाय तिने यावर सोनेरी दागिनेही परिधान केले होते. मोठे कानातले असतील, तर मोकळा गळा खुलून दिसतो. अगदीच गळा मोकळा ठेवायचा नसेल, तर एक नाजूक चेनही परिधान करू शकता.

Vidya Balan

कंगना रणौत

या नवरात्रौत्सवाच्या काळामध्ये तुम्ही कंगना रणौतचे लूक्सही ट्राय करू शकता. कंगनाही गेल्या काही दिवसांमध्ये सुंदर रेखीव साड्या परिधान करत आहे. तिचा लूकही तुम्हाला नक्कीच आवडेल. कंगनाने केशरी रंगाची, काळे काठ असलेली कांजीवरम साडी नेसली असून त्यावर काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला होता. तसंच तिने न्यूड मेकअपही केला होता.

Kangana Ranaut

दीपिका पादुकोण

अभिनेत्री दीपिका पादुकोणचा लाल साडी नेसलेला लूक चांगलाच चर्चेत होता. ती लाल रंगाच्या बनारसी साडीमध्ये खरंच खूप सुंदर दिसत होती. या साडीवर तिने त्याच रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. तसंच तिने गळाभर नेकलेस घातला होता आणि सुंदर भरगच्च ज्वेलरी घातली होती. नवरात्रीमध्ये तुम्ही दीपिकाचा हा लूक कॅरी कराल, तर चर्चेचा आणि कौतुकाचा विषय नक्कीच व्हाल.

Deepika Padukon

रेखा

अभिनेत्री रेखा वयाच्या साठीतही आकर्षक दिसते ते तिच्या अनोख्या लूकमुळे. ती नेहमी भरगच्च दागिने, सुंदर सुंदर साड्या, गजरे अशा पारंपरिक वेशात दिसते. अगदी नव्या नवरीप्रमाणे नेहमीच नटून थटून राहणाऱ्या रेखा यांचा हा लूक तुम्हाला १०० टक्के आवडेल.

Rekha

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT