Navratri Fashion  esakal
लाइफस्टाइल

Navratri Fashion : माधुरी, रकुल,रवीना सारखा सेम टू सेम लुक करणं इतकंही अवघड नाहीय; हे लुक एकदा ट्राय तर करा

गरब्याच्या मैदानात सगळ्यांनी सारखाच घागरा, ज्वेलरी घातलेली असते

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : सायंकाळ झाली की मेकअप करायला घ्यायचा, तो करतच त्यानंतर जो कोणता ड्रेस फायनल झाला असेल त्यावर मॅचिंग ज्वेलरी घालायची. आणि गरबा खेळताना पडू नये म्हणून थोडीशीच हिल असलेली सँडल घालायची आणि दांडिया सुरू असलेल्या मैदानात पळायचं, गेली दोन दिवस तरूणींच Evening Routine हेच आहे.

पण एवढी धावपळ करत केलेला लुक वाया जातो. जेव्हा त्या गरब्याच्या मैदानात सगळ्यांनी सारखाच घागरा, ज्वेलरी घातलेली असते. त्यामुळे आपली पत्नी किंवा मैत्रिण कशी ओळखायची हे कोडं मुलांना पडलेलं असतं.

तुम्हाला असा टिपिकल लुक करायचा नसेल तर हि बातमी नक्की वाचा. ज्यात तुम्हाला माधुरी दीक्षित, रवीना टंडन, सोनाली बेंद्रेचा यांच्यासारखेच सेम टू सेम दिसला येईल.  कसे ते पहा.

नाव घेतलं की शांत, लाघवी असा एक चेहरा समोर येतो. हम साथ साथ है, सरफरोश यांसारख्या चित्रपटातून सोनाली बेंद्रेनी काम केले आहे. सध्या अनेक टिव्ही रिऍलिटी शोतून सोनाली जजच्या रूपात दिसते.

भयानक आजारावर मात करून ती पुन्हा उभी राहीली आहे. सोनालीचा फॅशन सेन्स अगदी सुंदर आहे. ती कधीच ओव्हर ड्रेसअप करत नाही. (Navratri Fashion

सोनालीला लाल रंग वेगळी उर्जा देतो

यंदा तुम्हालाही सोनाली सारखंच सुंदर दिसायचं असेल तर लाल रंगाच्या शॉर्ट कुर्ती आणि धोती स्टाइल स्कर्टमधला सोनाली बेंद्रेचा हा लूक स्टायलिश आणि स्टनिंग आहे. अशा प्रकारचा फ्यूजन लूक गरबा नाईटसाठी तयार केला जाऊ शकतो.

रवीना टंडन

रवीना टंडन नेहमीच तिच्या लुकने लक्ष वेधून घेते. तिच्या लुकने आजही ती चाहत्यांना घायाळ करते. गरबा नाईटसाठी रवीना सारखा क्लासी लुक करायचा असेल तर तुम्ही हा ड्रेसअप करू शकता. लुंगी स्टाइल स्कर्ट आणि क्रॉप टॉप जोडून स्टायलिश लूक मिळवता येतो. (Fashion Tips)

रविनाचा ऑफ व्हाईट शांतता देतो

रकुल प्रित सिंग

सध्या प्लाझोचा ट्रेंड आहे. प्लाझोवर कोणत्याही प्रकारचा टॉप उठून दिसतो. प्लाझोवर शॉर्ट अन् लाँग टॉपही सुरेख दिसतो. तुम्हाला प्लाझोवर गरबाही सुंदर करता येईल. तुम्ही गरबा नाईटसाठी रकुल प्रीत सारखा पलाझो सूट आणि जॅकेट जोडले तर तुम्हाला एक अतिशय अनोखा आणि स्टायलिश लुक मिळेल.

रकुलचा हिरवा रंग निसर्गाची आठवण करून देतो

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित बस नाम ही काफी है! नृत्यातला कोणताही प्रकार असो शास्त्रिय संगीत वा डिस्को. माधुरीला येत नाही असं नाही. सगळ्यांच्या काळजात आजही त्या राज्य करतात. गरबा रात्रीमध्ये हेवी लेहेंग्याऐवजी, माधुरी दीक्षितसारखे क्रॉप टॉप आणि लाँग स्कर्ट वापरून पहा. यामध्ये तुम्हाला एथनिक लूक मिळेल आणि कम्फर्टेबलही असेल.

माधुरीचा नेव्ही ब्लू रंग तिच्या सौदर्यात आणखी भर घालतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Clash: मिरजेत दोन गटात राडा; तणाव नियंत्रणात, स्वतः एसपी उतरले रस्त्यावर

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद; स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर ‘आरबीआय’चे निर्बंध; काय आहेत निर्बंध, वाचा...

SCROLL FOR NEXT