लाइफस्टाइल

Nose Makeup Tips : चाफेकळी नाक प्रत्येकालाच हवंय?; असा द्या नाकाला परफेक्ट शेप!

तूम्हालाही तूमच्या पसरट नाकाला टोकदार बनवायचे असेल तर शस्त्रक्रियेऐवजी हे करा

सकाळ डिजिटल टीम

काही लोकांच्या चेहऱ्याचा रेखीवपणा चांगला असतो. तीक्ष्ण नाक अनेकदा लोकांचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. पण, काही लोकांच्या ओबड धोबड चेहऱ्यावर त्यांचे नाक अधिकच विचित्र दिसते. अशावेळी अनेक लोक नाकावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात.

अनेक अभिनेत्रींनीही हा सल्ला आजमावत आपल्या सौदर्यात भर घातली आहे. सामान्य कुटुंबातील महिलावर्गासाठी ते परवडणारे नाही. तूम्हालाही तूमच्या पसरट नाकाला टोकदार बनवायचे असेल तर शस्त्रक्रियेऐवजी मेकअप आणि इतर काही गोष्टींचा वापर करणे फायद्याचे ठरू शकते.

नाकाला कायमस्वरूपी टोकदार बवनणे शक्य नाही. त्यामूळे मेकअपमधील काही आयडीया वापरून तुम्ही नाकाला हवा तसा आकार देऊ शकता. होय, मेकअपच्या काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही नाक चाफेकळी बनवू शकता.

जाड नाक बारीक दिसावं, यासाठी सर्वांत आधी नोज पिन किंवा नथ बदला. आपल्या नाकावर कुठली नथ चांगली दिसेल, याबाबत एखाद्या ब्युटीशियनचा सल्ला घ्या.

जाड नाक छोटे दिसावे, यासाठी कंटूरिंग मेकअपचा उपयोग होऊ शकतो. एखाद्या ब्युटीशियनकडून तुम्ही एकदा कंटूरिंग मेकअप करायला शिकलात, तर घरीसुद्धा तुम्ही हा मेकअप करू शकता. नाक कंटूरिंग करताना ब्रश वापरण्यास विसरू नका. यामुळे तुमचा मेकअप चांगला बसतो.

मेकअपसह नाक टोकदार बनण्यासाठी परफेक्ट शेड निवडणे फार महत्वाचे आहे. चुकीची शेड निवडल्याने तुमच्या नाकाचा मेकअप हायलाइट होऊ शकतो. ज्यामुळे तुमचा लुक विचित्र दिसू लागतो.

नाक छोटे दिसावे, यासाठी केसांच्या स्टाइलबाबतही विचार करू शकता. एका बाजूला केलेले केस चांगले दिसतात. यासाठी उजव्या बाजूला शक्य तितक्या खाली भांग पाडून अधिकाधिक केस एका बाजूला ठेवा; पण अशा प्रकारचा हेअरकट करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. 

नाक जास्ती चपटे असेल, तर नाकाच्या दोन्ही बाजूंना चटकन लक्ष जाईल, असं आकर्षक किंवा चमचमत्या रंगाचं ब्लशर किंवा फाउंडेशन लावा. नाकाच्या दोन्ही बाजूंच्या टोकांवर गडद फाउंडेशन आणि मधल्या भागात फिके फाउंडेशन लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Kolhapur Accident Video : कोल्हापूरमध्ये मद्यपी ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरच्या भांडेवाडी परिसरात आढळला बिबट्या, वनविभागाच्या वेगवेगळ्या रेस्क्यू सुरु

MPSC Success : संघर्ष ते यशाचे शिखर! सायकलवर भंगार गोळा करणाऱ्या वडिलांच्या कन्येची MPSC त राज्यात पहिली झेप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

SCROLL FOR NEXT