Makeup Tips esakal
लाइफस्टाइल

Makeup Tips : ब्लशरशिवाय मेकअप अपूर्णच, गणेश चतुर्थीला अगदी परफेक्ट रेडी व्हायचं असेल तर या टिप्स लक्षात घ्या

बाप्पाच्या आरतीसाठी परफेक्ट रेडी व्हायचं असेल तर ब्लशर लावताना काही चुका टाळायला हव्यात

साक्षी राऊत

Makeup Tips : बाप्पाच्या आगमनासाठी घरात डेकोरेशन, खाण्याचे पदार्थ या सगळ्यांची तयारी अगदी आठवड्याभरापूर्वीपासून सुरु असते. घरात बाप्पाचं आगमन म्हणजे दिवाळीप्रमाणे मोठा सणच. बाप्पाच्या आरतीसाठी महिला यावेळी नटून थटून तयार होतात. मेकअपसंदर्भात बोलायचे झाल्यास ब्लशरशिवाय मेकअप अपूर्णच. ब्लशरने चेहऱ्यावर वेगळाच ब्लश येतो.

बाप्पाच्या आरतीसाठी परफेक्ट रेडी व्हायचं असेल तर ब्लशर लावताना काही चुका टाळायला हव्यात. ब्लशर अप्लाय करताना तुमच्या स्किन टोननुसार ब्लशर निवडायला हवा.

तीन प्रकारचे असतात ब्लशर

ब्लशर तीन प्रकारचे असतात.

पावडर ब्लश - हे प्रोडक्ट पावडर फॉर्ममध्ये असते ते ऑयली स्किनसाठी परफेक्ट आहे.

लिव्किड ब्लश - हे प्रोडक्ट ब्लश ट्यूबमध्ये येतं. ड्राय स्किनसाठी ते परफेक्ट आहे.

केक यो क्रिम बेस - हे प्रोडक्ट कॉम्बिनेशन स्किनवर अप्लाय केल्यास स्किन हायड्रेट राहते.

ब्लशर लावण्यासाठीच्या काही टिप्स

ग्लो

ब्लशर व्यवस्थित अप्लाय केल्यास तुमच्या डल स्किनवर फ्रेश रोजी ग्लो दिसतो. यासाठी ब्लशर लावताना त्यात थोडा गोल्डन शिमर मिक्स करा, त्यामुळे ब्लशरचा टोन बॅलेंस होईल.

योग्य कव्हरेज

चेहऱ्याला योग्य कव्हरेज देण्यासाठी ब्लशर गालावर लावताना व्ही आकारात अप्लाय करा.

ब्लशरचा रंग

ब्लशरचा रंग निवडताना दोन गोष्टींवर विशेष फोकस असावा. पहिली म्हणजे तुमच्या ड्रेसचा कलर आणि दुसरी म्हणजे स्किन कलर. त्याप्रमाणे तुमच्या ब्लशरचा रंग निवडावा. (Ganesh Festival)

जेल ब्लशर

जेल ब्लशर तुम्ही गालावर किंवा ओठांवर अप्लाय करू शकता. मात्र या लिक्विडपेक्षा क्रिम जेलचा टेक्श्चर फार वेगळा असतो. जेल ब्लशर तुम्हाला लाँग लास्टिंग आणि नॅचरल मॅट स्टेन लुक देतं. (Beauty Tips)

ब्लशर अप्लाय करण्यासाठीच्या खास टिप्स

ब्लशर लावण्यासाठी फाउंडेशनचा बेस तयार करून सगळ्यात आधी चेहऱ्यावर ब्लश अप्लाय करा. ब्लश लावण्यासाठी चांगल्या ब्रँडचा ब्लेंडिंग ब्रश वापरा. ब्लशर गालावर लावण्यापूर्वी हातावर डॅब करून बघा. नंतर गालावर अप्लाय करा. ब्लशर अप्लाय केल्यानंतर ब्रश अगदी व्यवस्थित ब्लेंड करायला विसरू नका. ब्लशर कायम कानाकडून गालाकडे अप्लाय करत आणा. चिकबोनपासून खाली ब्लशर अप्लाय करताना कानाकडेच ब्लेंड करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT