Tobacco Cigarette esakal
लाइफस्टाइल

आजच्याच दिवशी पहिल्यांदा झाला होता सिगारेटमध्ये तंबाखूचा वापर

5 मार्च 1558 रोजी म्हणजेच आजच्याच दिवशी फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला होता.

सकाळ डिजिटल टीम

5 मार्च 1558 रोजी म्हणजेच आजच्याच दिवशी फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला होता.

धुम्रपान (Smoking) आरोग्यासाठी नुकासानदायक आहे हे प्रत्येकाला माहित आहे पण तरीही अनेकजण धुम्रपान करतात. 5 मार्च 1558 रोजी म्हणजेच आजच्याच दिवशी फ्रान्सिस्को फर्नांडिस (Francisco Fernandes) यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा (Tobacco) वापर केला होता. त्यानिमित्ताने आपण आज तंबाखूचा इतिहास आणि तंबाखू सेवनामुळे एका व्यक्तीला वर्षाला एकाचा किती खर्च होता तसेच तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यास कोणते आजार होतात ते पाहूयात.

तंबाखू सेवनाने भारतात (India) साधारणत: १० लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) साधारणत ३६ टक्के पुरुष व पाच टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने अनेकांचा बळी जातो. प्रत्येक तंबाखू खाणारा व्यक्ती तंबाखू आवड म्हणून नाहीतर गरज म्हणून खात असतो. आपल्या आजूबाजूला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे अनेक लोक आहेत. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी आपण नेहमीच पाहतो. धूम्रपान करणे हे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे आपण सर्वजणच जाणतो.

फार पुरातन काळापासून माणसाने निरनिराळ्या वनस्पतींच्या पानांचा उपयोग व वापर खाण्यासाठी, चघळण्यासाठी, तपकिरीसाठी, ध्रूमपानासाठी किंवा औषधांसाठी केला आहे. यात संपूर्ण जगात तंबाखूसारखा प्रसार दुसऱ्या कोणत्याही वनस्पतीचा झालेला नाहीयेय. किंबहुना तंबाखूएवढी लोकप्रियता इतर कोणत्याच वनस्पतीला लाभलेली नाहीयेय. तंबाखू या वनस्पतीला संस्कृतमध्ये ताम्रपर्ण, ताम्रकुट, धुम्रपत्र अशी नावे असून शास्त्रीय नाव 'निकोटिआना टॅबकम' आहे. भारतातील प्राचीन साहित्यामध्ये तंबाखूचे 'तमाखू' असे वर्णन आहे.

यावेळी ग्रामसुधार समिती आणि व्यसनमुक्तीचे अभ्यासक डॉ. ॲड. बाबुराव हिरडे म्हणाले, प्रत्येकांना हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही. प्रत्येक तंबाखू खाणारा व्यक्ती तंबाखू आवड म्हणून नाही तर गरज म्हणून खात असतो. तंबाखूचे सेवन केल्यास माणसांचे आयुष्य १० वर्षांनी घटते. तसेच तो व्यक्ती पाच वर्ष आजारातच जगत असतो. या सर्व व्यसनांपासून प्रत्येकांनी दूर राहून आरोग्य संपन्न जगले पाहिजे.

डॉ. हिरडे यांच्या म्हणण्यानुसार एका व्यक्तीला तंबाखू चोळून त्यानंतर ती मळून तोंडात ठेवण्यासाठी एका व्यक्तीस कमीतकमी सात-आठ मिनीटे लागतात. तंबाखू पुडी १० रुपये आणि चुना डबी दोन रुपयेप्रमाणे पर व्यक्तीचा रोजचा खर्च १२ रुपये होतो. त्यानुसार महिन्याचा खर्च ३६० रुपये तर वर्षाचा खर्च होतो चार हजार ३२० रुपये.

तंबाखू खाण्याची कारणे

- उत्सुकता : आयु्‌ष्यात एकदाही तंबाखू खाल्ली नसेल तरीही त्याची चव कशी असते, ते खाल्यावर कसे वाटते या उत्सुकतेने उत्साही लोक तंबाखू खाण्याकडे वळतात.

- अफवा : तंबाखू खाल्यावर दात दुखणे थांबले जाईल, दातामधून पाणी येणार नाही आणि रात्री जागरण करण्यासाठी तंबाखू उपयुक्त असते असे अफवा पसरवली जातात म्हणून तंबाखू खाल्ली जाते.

- अनुकरण : आपल्या आजूबाजूस असणारा व्यक्ती तंबाखू खाताना त्यांचे अनुकरुन करुन उत्सुकतेने तंबाखू खाण्याकडे भर दिला जातो.

- गरज : अनेकांना काही गैरसमज झालेले असतात की, तंबाखू खाल्याशिवाय कोणते काम होत नाही, काही सुचत नाही, म्हणजे तंबाखू ही आवड नाही तर गरज बनली जाते.

- खोटे अपवाद : तंबाखू पदार्थाचे सेवन केल्यावर आजार उद्भवला जावू शकतो, असे सांगूनही काहीजण खोटे अपवाद पसरवून तंबाखू खाण्याकडे भर देतात.

तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यास हे होतील आजार

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांना हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे या व्यसनापासून दूर राहणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना समन्स बजावले, हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Shirpur Election : काँग्रेसचा बालेकिल्ला आता भाजपमय! अमरीशभाई पटेलांच्या नेतृत्वाखालील भाजप स्वबळावर ठाम

Latest Marathi News Live Update : वंदे मातरम हे भारताचे एक पवित्र गीत आहे - हर्षवर्धन सपकाळ

Ranji Trophy 4th Round: मुंबईची दणक्यात सुरुवात, मुशीर खान, सिद्धेश लाडची शतकं; महाराष्ट्राविरुद्ध कर्नाटकच्या अडीचशे धावा पार

Thane News: तातडीने उपाययोजना न झाल्यास भटके कुत्रे महापालिकेत सोडू, ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा; प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT