Paneer Phool  esakal
लाइफस्टाइल

Paneer Phool :  तुम्हाला माहितीय का हे पनीर फूल काय आहे ?

ही औषधी वनस्पती असून ती अनेक आजारांत फायद्याची ठरते

Pooja Karande-Kadam

Paneer Phool :   जगातील अनेक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. असं असलं तरी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या नजरेत कधी आलेल्या नाहीत. पण जेव्हा अचानक आपण त्या वस्तूबद्दल ऐकतो तेव्हा आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो.

तुम्ही मार्केटमध्ये अनेकवेळा एका मसाल्याबद्दल ऐकले असेल. किंवा बाजारात गेल्यावर तुम्ही ही वस्तू पाहिली असेल. ती म्हणजे पनीर फूल. पण हे नक्की काय आहे, त्याचा उपयोग काय आहे याबद्दल तुम्हाला फारशी माहिती नसते.

तुम्ही पनीरची भाजी खूप खाल्ली असेल पण तुम्हाला माहीत आहे का की पनीरचे एक फूलही असते? आपल्या सर्वांना माहित आहे की पनीर दुधापासून बनते आणि ते कोणत्याही वनस्पतीपासून मिळत नाही. मग पनीर फूल कुठून येते आणि ते कशासाठी वापरले जाते? हे बऱ्याच लोकांना माहिती नाही.

पनीरचे फूल म्हणजे काय?

पनीरचे फूल खरे तर सोलन प्रकारातील एक फूल आहे. जे प्रामुख्याने भारतात आढळते. अश्वगंधाप्रमाणेच या झाडावर ही फुले गुच्छात उगवतात. त्याची फळेही अशीच तयार होतात. त्याची फळे लहान टोमॅटोसारखी आणि रास्पबेरीसारखी असतात.

ती फुलांच्या पाकळ्यांमध्ये बंद असतात. याला पनीर डोडा आणि इंडियन रेनेट असेही म्हणतात. आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. हे चवीला गोड आहे आणि भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भरपूर प्रमाणात पिकवले जाते.

या फुलांचा उपयोग काय?

आयुर्वेदीक औषधे

पनीरच्या फुलांचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी केला जातो. त्यात निद्रानाश, चिंता, दमा आणि मधुमेहाशी लढण्याची क्षमता आहे. हे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित करू शकते, म्हणून याचा उपयोग मधुमेह व्यवस्थापनात केला जातो. हे स्वादुपिंडाच्या बीटा पेशींची दुरुस्ती देखील करते, जे इंसुलिन तयार करतात.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

लठ्ठपणा ही आजच्या काळातील गंभीर समस्यांपैकी एक आहे जी आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये काही बदल करून तसेच योग्य प्रकारचे अन्न सेवन करून नियंत्रित केली जाऊ शकते. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी व्यायाम किंवा योगासने करतात पण योग्य आहार घेत नाहीत त्यामुळे लठ्ठपणा कमी होत नाही. पण आज वजन कमी करण्यासाठी अनेकांना पनीरचे फूल आवडते.

जर तुम्हीही लठ्ठपणाच्या समस्येशी झुंज देत असाल तर पनीरची फुले तुम्हाला या समस्येत मदत करू शकतात. पनीरच्या फुलामध्ये काही औषधी गुणधर्म आढळतात जे लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतात. पनीरमध्ये इथेनोलिक अर्क असतो जो लठ्ठपणाच्या समस्येशी लढण्यासाठी उपयुक्त आहे.

पनीरची फुले दम्यामध्ये फायदेशीर आहेत

अस्थमा हा असा आजार आहे ज्यामध्ये रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. आयुर्वेदानुसार वात आणि कफ दोषामुळे दमा होतो, ज्यावर त्वरित उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. जर तुम्हालाही दम्यासारख्या आजाराने ग्रासले असाल किंवा या जीवघेण्या आजारापासून स्वतःला वाचवायचे असेल, तर तुमच्यासाठी पनीर दोडा हा एक उत्तम उपाय आहे.

पनीरच्या फुलामध्ये अनेक प्रकारचे घटक आढळतात जे दम्यामध्ये खूप फायदेशीर असतात. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, आयुर्वेदासोबतच पनीरच्या फुलाचा उपयोग युनानी पारंपारिक वैद्यकीय पद्धतींमध्ये दम्याच्या उपचारासाठी केला जातो.

निद्रानाशाच्या समस्येवर प्रभावी

आजकाल मानसिक आणि शारीरिक अस्वस्थता, तणाव आणि चिंता अशा अनेक कारणांमुळे लोक निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त आहेत. निद्रानाशाच्या या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास अनेक प्रकारचे मानसिक आजार उद्भवू शकतात. काही लोकांसाठी ही समस्या काही आठवडे किंवा काही दिवस टिकते, तर अनेकांना ही समस्या अनेक महिने टिकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : ''मीसुद्धा तो व्हिडीओ बघितला, पण...''; संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Matru Suraksha Din 2025: मातृत्व अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार कोणत्या योजना राबवतंय? जाणून घ्या आजच!

बाबो! भाईजान लग्न करतोय? सलमानच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण, नेटकरी म्हणाले...'दारु पिऊन काहीही...'

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

UAE Golden Visa confusion: 23 लाखांत मिळतोय लाइफटाइम गोल्डन व्हिसा? युएई सरकारने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT