Parenting Tips  esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : मुलं उलट बोलायला लागली आहेत?; स्वत:मध्ये करा हा बदल

मुलांमध्ये बदल करण्याआधी स्वत:मध्ये करा!

Pooja Karande-Kadam

 Parenting Tips : सध्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना प्ले ग्रुपपासून शाळेत घातले जाते. पण, त्यांच्या शिक्षणाची खरी सुरूवात ही घरापासूनच होते. आई वडिल, भावंड,आजी आजोबा यांच्यासोबत वावरताना ते बऱ्याच गोष्टी शिकत असतात.

आपल्या पाल्याने चांगलं बोलावं, चांगलं वागावं असं कितीही वाटत असलं तरीही मुलं बिघडतात. तुमच्या न कळत ते हट्टी होतात. उलट बोलायला, दुसऱ्याला मारायाला शिकतात. पालकांना आपल्या मुलाला बऱ्या वाईट गोष्टी शिकवायची असतात, परंतु बऱ्याच वेळा मूल आपण शिकवलेल्या गोष्टींकडे पाठ फिरवते आणि विचारते की तुम्ही स्वत: त्या गोष्टी करता का?

ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलाला शिकवत आहात, त्या तुम्ही स्वत: करता का? मुले प्रश्न विचारल्यावर काही पालकांना राग येऊ शकतो, तर काही त्यांच्या प्रश्नांवर गप्प बसतात. पण मुलांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यानं समाधान होत नाही आणि तुम्ही शिकवलेली जीवनमूल्य सहजासहजी अंगीकारली जात नाहीत.

पालकांनी मुलांच्या प्रश्नांचा आदर केला पाहिजे आणि एक चांगला श्रोता म्हणून त्यांचे बोलणे ऐकले पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते आणि मूल सुसंस्कृत होते. चला तर मग जाणून घेऊयात मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी पालकांनी आपल्या आयुष्यात कोणते बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

मुलांना मोबाईलपासून दूर कसं ठेवायचं

पालक स्वत: दिवसभर फोनवर व्यस्त असतील किंवा गॉसिपिंग, चॅटिंगमध्ये व्यस्त असतील, तर मूलही तुम्हाला पाहून तेच शिकते. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही मुलाला मोबाईल वापरण्यास मनाई करता किंवा त्याला अभ्यासात लक्ष देण्यास सांगितले तेव्हा तो मागे वळून तुम्हाला प्रश्न करू शकतो की तुम्हीही फोन वापरता.

तुम्ही मोबाईलमध्ये बसलात तर तेही बसतील हे लक्षात ठेवा. म्हणूनच मुलाला खेळात गुंतवून ठेवा. त्यांच्यासोबत फिरायला जा आणि त्यांच्यासोबत काही कामांमध्ये गुंतण्यासाठी वेळ काढा.

कधी कधी मुलांना प्रेमाने समजावण्याचीही गरज असते

मित्र बना

मुलं घराबाहेर पडली की नवीन मित्र बनवतात. तो बाहेरून अनेक गोष्टी शिकतो, ज्या चांगल्या आणि वाईट दोन्ही असू शकतात. मूल जेव्हा मोठे होऊ लागते तेव्हा तो पालकांपासून गोष्टी लपवू लागतो. पण जर तुमची इच्छा असेल की मुलाने तुमच्यापासून काहीही लपवू नये, तर त्याला मित्रासारखे वागवा.

स्वत:लाही सवयी लावा

तुमच्या मुलाला पुस्तक वाचण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, पुस्तक स्वतः वाचा. जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या हातात गॅझेट्सऐवजी एखादे पुस्तक घ्याल तेव्हा मूलही तेच करेल. तुमच्या मुलाला तुम्हाला काय शिकवायचे आहे ते दाखवून द्या.

मुलांशी नम्रतेने वागा

मुलाने नम्र व्हावे आणि इतरांचा आदर करायला शिकावे असे तुम्हाला वाटत असेल, तर आधी तुम्ही मुलाला आदर देण्यास सुरुवात करा. त्यांच्याशी प्रेमाने आणि नम्रपणे बोला. तुम्हाला पाहून, मूल स्वतः ही सवय जीवनात समाविष्ट करते आणि आदर करायला शिकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT