लाइफस्टाइल

नेहमी गोंधळात टाकणाऱ्या बार, क्लब, पब आणि लाउंजमधील नेमका फरक काय?

सकाळ डिजिटल टीम

Difference Between Bar, Pub, Club And Launge : अनेकांना विकएंडला पार्टी करायला आवडतं. त्यात पार्टीच नाव कानावर जरी पडलं तरी अनेकांच्या मनात क्लब, बार, पब आणि लाउंज आदी ठिकाणांचे विचार फिरण्यास सुरूवात होते.

alcohol

तुम्हीदेखील वरील ठिकाणी अनेकदा एन्जॉयमेंटसाठी गेला असाल. मात्र, काही जणांनी यापैकी सर्वांची नावं ऐकली असतील मात्र, प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेतला नसेल. अनेक जण या ठिकाणांवर नेहमी जातात. परंतु, अनेकांना यांच्यातील नेमका फरक काय आहे याची माहिती नाहीये. आज आम्ही तुम्हाला यातील नेमका फरक काय याबद्दल सांगणार आहोत.

restaurant bar

बार (BAR)

बार म्हणजे दारू विकण्याची परवानगी असलेली जागा. बारमध्ये दारू दिली जाऊ शकते. तुम्ही या ठिकाणी बसून अल्कोहोलदेखील घेऊ शकता. तथापि, दारू संपल्यानंतर तुम्ही येथे जास्त काळ बसू शकत नाही. बार चालवण्यासाठी विशेष परवानगी आवश्यक असते. या परवान्यानंतरच येथे दारूची विक्री केली जाऊ शकते. याशिवाय तुम्हाला बारमध्ये खाण्याचे अनेक पर्यायही मिळतात.

पब (Pub)

पब हे सार्वजनिक घरासारखे असते. पबमध्ये अल्कोहोलिक पेयं दिली जातात . पबमध्ये होम लाईफसारखे वातावरण मिळते. येथे बारसारख्या ठराविक ठिकाणी बसूनच दारू पिण्याचे नियम नाहीत. तुम्ही पबमध्ये दारू पिण्यासोबतच डान्सदेखील करू शकता. याशिवाय इतरही अनेक प्रकारच्या अॅक्टिव्हिटी येथे होतात.

friends

क्लब (Club)

बार आणि पबपेक्षा क्लबमध्ये जास्त जागा असते. क्लबमध्ये तुम्हाला एक मोठा डान्स फ्लोअर किंवा डान्स स्टेज पाहायला मिळते. क्लबमध्ये जाण्यासाठी प्रवेश शुल्क देखील द्यावे लागते. याशिवाय तुम्ही मेंबरशिपच्या माध्यमातूनही येथे प्रवेश घेऊ शकता. लोक मुख्यतः अधिक काळ आनंद घेण्यासाठी पबला प्राधान्य देतात.

लाउंज (Lounge)

लाउंजमध्ये तुम्हाला कोच आणि लाउंज खुर्ची मिळते. येथे तुम्ही निवांत बसू शकता. बारच्या तुलनेत लाउंजमध्ये थोडेसे कमी नियम असतात. यामुळे तुम्ही येथे बराच काळ बसू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT