Relationship Tips esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : सासू-सुनेत नेहमी भांडणं व्हायलाच हवीत का? असं होईल सासूसोबत Strong Relation

दररोज किंवा दर दोन दिवसांनी तिच्याशी बोलण्यासाठी वेळ काढा

सकाळ डिजिटल टीम

Relationship Tips : आजवर चित्रपट आणि मालिकांमध्ये प्रत्येक भांडण, वाद हे सासू सुनेमुळे होतात. त्यांच्या वादामुळे घर विभागतात, घरांतील लोकांमध्ये वाद होतात असं दाखवलं गेलं आहे. रिअलमध्येही काही घरात हेच सुरू असतं. कारण, त्या दोघींचे नाते कधीच मैत्रिपूर्ण होऊ शकत नाही, असे लोकांनी गृहित धरलेलं असतं.

पण क्वचित एखादी सासू-सुनेची जोडी जी सतत एकत्र असेल. ज्या एकमेकींच्या मैत्रिणी असतील. एकमेकींना सर्वकाही शेअर करत असतील. तर त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं जातं. पण खरंच गरज आहे या नात्यालाही समजून घेण्याची. एकमेकींना वेळ देऊन आदर्श सासू-सून होण्याची. पण त्यासाठी काय करावं? असा प्रश्न पडला असेल तर या टिप्स तुम्हाला मदत करतील.  

एकमेकींशी गोष्टी शेअर करा

आजकाल काळ बदलला आहे, आता पूर्वीसारखे सासू-सुनेचे भांडण नाही, पण समजूतदारपणा आहे. पण सासू-सासऱ्यांसोबतचे संबंध ताणले गेले तर त्यात सुधारणा होऊ शकते. तुमच्या सासूला तुमची मैत्रीण बनवण्यासाठी आधी छोट्या छोट्या गोष्टी शेअर करा आणि तिच्याशी गॉसिप करा. यामुळे तुमच्यात आणि त्यांच्यात चांगले बंध निर्माण होईल.

गैरसमजांना जागा देऊ नका

नाते कोणतेही असो गैरसमज निर्माण झाले तर नाते कधीही बिघडू शकतात. त्यामुळे जर कधी असं झालं की, तुमच्या काही बोलण्यामुळे तुमच्या सासूला वाईट वाटत असेल किंवा तुमचं नातं बिघडणार असेल, तर लगेच तिच्याशी बोलून सगळं क्लिअर करा. नाहीतर एक छोटासा गैरसमज नाते बिघडवू शकतो.

एकमेकींना वेळ द्या

आजकाल अनेक सुना ऑफिसला जात असतात. अशा स्थितीत दिवसभर ऑफिसमध्ये काम करणं आणि संध्याकाळी घरी येणं, जेवण बनवणं आणि मग जेवणं आणि झोपणं हा नित्याचा दिनक्रम झाला आहे.

पण जर तुम्ही सकाळी लवकर उठला किंवा ऑफिसमधून आल्यानंतर सासू-सासऱ्यांसोबत थोडा वेळ घालवला तर त्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकते. जर तुमची सासू तुमच्यासोबत राहात नसेल. तर दररोज किंवा दर दोन दिवसांनी तिच्याशी बोलण्यासाठी वेळ काढा. त्यांच्या तब्येतीचीही विचारपूस करत रहा.

एकमेकांचे महत्त्व समजून घ्या

जसे तुम्ही तुमच्या मित्रांची काळजी घेता आणि त्यांना महत्त्व देता,तसेच तुमच्या सासू-सासऱ्यांसोबत राहा. हे लक्षात ठेवा की तुमच्यासाठी एकमेकांचे महत्त्व समजून घेणे खूप महत्वाचे आहे.

कारण एकमेकांची निंदा केल्याने,चूका दाखवल्याने घरात कलह निर्माण होऊ शकतो. ज्याचा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एकमेकांचा आदर करा आणि कौटुंबिक वातावरणही चांगले ठेवा.

सासू-सासऱ्यांना विशेष वागणूक द्या

एकमेकांच्या आवडीनिवडी सांभाळून त्यांचे पालन करा.यावरून लक्षात येते की तुम्ही किती समोरच्या व्यक्तीचा आदर करा. सुट्टीच्या दिवशी तुम्ही तुमच्या सासूबाईंच्या आवडीचे जेवण बनवू शकता.

मैत्रिणींसोबत बाहेर जाण्याऐवजी सासूसोबत खरेदीला जा, ज्यामुळे त्यांना विशेष वाटेल. तसेच, तुम्हा दोघींनीही एकमेकांच्या आवडी-निवडी जपण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT