Relationship Tips  esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : 'या' ७ औषधांनी कमी होते लैंगिक इच्छा, काय सांगतो अभ्यास?

आता आम्ही अशा एका अभ्यासाविषयी सांगणार आहोत जे वाचून तुम्हाला धक्का बसेल.

सकाळ डिजिटल टीम

7 Drugs That May Be 'Secretly' Lowering Your Sex Drive : वैवाहिक जीवनाचा पाया जोडप्याच्या लैंगिक संबंधावर बहुतांश अवलंबून असतो असं मानलं जातं. जोडप जेवढ sexually active तेवढं त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदी असं काही अभ्यासांती समोर आलं आहे. पण आता आम्ही अशा एका अभ्यासाविषयी सांगणार आहोत जे वाचून तुम्हाला धक्का बसेल.

Relationship Tips

आपण जरा काही दुखलं की, औषधं घेतो. असा अस्वस्थ वाटलं की, घे औषध ही मानसिकता आपल्यासाठी किती धोकादायक आहे याची कल्पनाच आपल्याला नसते. आता असाच एक आभ्यास समोर आला आहे. आपण रोजच्या जीवनात फार काळजी न करता ज्या औषधांचं सेवन करतो अशा ७ प्रकारच्या औषधांमुळे लैंगिक इच्छा हळू हळू कमी होऊ शकते.

Drugs harmful for sex drive

कोणती आहेत ती औषधं?

पेनकिलर्स - पेनकिलर हे टेस्टोस्टेरॉन तसंच पुरुष आणि स्त्रियांमध्या लैंगिक इच्छा निर्माण होण्यासाठी महत्त्वाच्या अशा विविध हार्मोन्सचे उत्पादन कमी करण्यासाठी ओळखलं जातं. त्यामुळे पेनकिलर फक्त तुमचं दुखणंच कमी करत नाही तर लैंगिक इच्छाही कमी करतात.

relationship tips

अँटी डिप्रेसंट - ही औषधं डिप्रेशनवर उपचार करण्यासाठी वापरली जातात आणि कामवासना किलर म्हणून ओळखली जातात. कामवासना कमी होण्याशी संबंधित सर्वात सामान्य अँटीडिप्रेसंट लक्षणांमध्ये सेक्समध्ये रस कमी होणे, उशीर झालेला भावनोत्कटता, विलंबित स्खलन (ऑरगॅझम) किंवा कामोत्तेजना नसणे, अजिबात स्खलन न होणे आणि पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन यांचा समावेश होतो.

गर्भनिरोधक गोळ्या - महिला गर्भनिरोधक गोळ्या खातात त्यामुळे सेक्स हार्मोन्स कमी होतात आणि हळूहळू कामवासनापण कमी होते. त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्या लैंगिक आयुष्यासाठी कमी फायदेशीर आहे.

स्टॅटिन्स आणि फायब्रेट्स - ही औषधं प्रामुख्यानं हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी वापरली जातात. याचा टेस्टॉस्टेरोन, इस्ट्रोजन आणि इतर लैंगिक हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये प्रामुख्याने परिणाम करतात. अभ्यासानुसार या औषधांच्या दुष्परिणामांचा निष्कर्ष असा निघतो की, यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकतं.

बेंझोडायझेपाइन्स - ट्रँक्विलायझर्स - बेंझोडायझेपाइन, सामान्यतः सिडक्टिव्ह म्हणून ओळखला जातो. याचा उपयोग एन्झायटी, निद्रानाश आणि स्नायू जखडणे यासाठी होतो. बेंझोडायझेपाइनचा दुष्परिणाम सेक्शुअल इंटरेस्ट, उत्तेजना आणि संवेदना यावर होतो. यामुळे लैंगिक हार्मोन्सवर परिणाम होतो. संप्रेरक उत्पादन व्यत्यय आणू शकतात, कमकुवत संभोग, वेदनादायक संभोग, स्खलन समस्या असे दुष्परिणाम होतात.

रक्तदाब औषधे - उच्च रक्तदाबाच्या औषधामुळे एखाद्याला लैंगिक अकार्यक्षमतेचा सामना करावा लागतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उच्च रक्तदाबाच्या स्थितीवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांमुळे लैंगिक समस्या वाढू शकतात. औषधांमुळे पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा कमी होते, ज्यामुळे इरेक्शन आणि स्खलन प्रभावित होते. स्त्रियांमध्ये, योनिमार्गात कोरडेपणा, इच्छा कमी होणे आणि कामोत्तेजनामध्ये अडचणी येऊ शकतात.

अँटीहिस्टामाइन्स - मुख्यतः ऍलर्जी-संबंधित लक्षणे नियंत्रित करण्यासाठी वापरली जातात. जसे की सतत शिंका येणे आणि नाक वाहणे. पण याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. यामुळे पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा स्खलन समस्या, तर महिलांना योनीमार्गात कोरडेपणाचा सामना करावा लागतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT