अनेकांना त्यांच्या आयुष्यात प्रेम मिळतं तर अनेकजण सक्सेसफुल असूनही सिंगल असतात. तर अनेकजण त्यांचं रिलेशन टिकवण्यासाठी धडपड करत असतात. मात्र ते अयशस्वी ठरतात. तुमच्या मित्राला पार्टनर सोबत बघून अनेकदा तुम्हाला वाईटही वाटतं. पण तुम्हाला जेव्हा सिंगल असण्याचे फायदे कळेल तेव्हा तुम्ही तुमची लाईफ खऱ्या अर्थाने एन्जॉय करू शकाल. (Know the advantage of single life)
एका रिपोर्टनुसार, सिंगल लोकांकडे स्वत:साठी भरपूर वेळ असतो. मात्र लग्नानंतर किंवा रिलेशनशिपमध्ये तुम्हाला तुमचा वेळ तुमच्या पार्टनरला द्यावा लागतो. अशा वेळी काम, रिलेशनशिप या सगळ्यांना वेळ देता स्वत:ला वेळ देणे अशक्य ठरते. सिंगल व्यक्ती मात्र स्वत:ला हवा तसा वेळ देऊ शकतात.
लग्न झालेल्या लोकांवर जबाबदाऱ्या वाढतात. ऑफिस, घर, कुटुंब या सगळ्यांमध्ये जबाबदाऱ्या वाढल्याने तणाव वाढतो. मात्र सिंगल लोकांचं असं काही नसतं. सिंगल लोक तणावमुक्त जगू शकतात.
ऑफिसची कामं आणि पार्टनरला वेळ देता देता अशा लोकांना स्वत:साठी अजिबात वेळ नसतो. त्यांच्या झोपेवरही याचा परिणाम होतो. मात्र तुम्ही सिंगल असाल तर तुम्ही तुमची झोप पूर्ण करू शकता. योग्य झोप घेतल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहातं. महत्वाचं म्हणजे तुमचे कोणाशी वाद होणार नाहीत. तुम्ही हवं तसं त्यावेळी मोकळेपणाने वावरू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.