Remedies For Hiccups esakal
लाइफस्टाइल

Remedies For Hiccups : उचकी लागलीय अन् काय करावं कळेना? हे उपाय जरा बघून घ्या!

uchaki lagane upay: उचकी नेमकी कशी लागते

Pooja Karande-Kadam

Remedies For Hiccups : उचकी नैसर्गिक आहे आणि त्यावर आपले नियंत्रण नाही. उचकी अनेक कारणांमुळे येते. कधी काही सेकंदात किंवा मिनिटांत उचकी येणे थांबते, तर कधी काही तास त्रास होऊ शकतो.

उचकी एखाद्याच्या स्मरणशक्तीशी जोडली जाऊ शकते, परंतु प्रत्यक्षात त्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत. उचकी पचनसंस्थेतील समस्यांशी संबंधित असू शकते. जेव्हा अधिक उचकी येते तेव्हा ते त्रासाचे कारण बनते.

उचकी लागणे म्हणजे छाती व पोट यामधील पडदा आणि बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होणे व त्याचवेळेस स्वर यंत्रातील स्वरतंतु व्होकल कॉर्ड एकमेकांजवळ येणे. हे कार्य मज्जा संस्थेचे असते.

मेंदूतून येणाऱ्या व्हेगस व फ्रेनिक या मज्जा तंतुच्या नसा उचकी लागण्यास महत्त्वाचे कार्य करतात. व्हेगस या नसेतून अन्ननलिका व जठराच्या आतील भागातुन संवेदना मेंदूकडे जातात.त्याने एका प्रक्षेपित क्रियेची सुरुवात होते.

उचकी का लागते जाणून घेऊया याचे कारणे.

  • जेवण घाईघाईत होणे.

  • तिखट खाणे, त्याची गरळ तोंडत येणे.

  • पाणी जोरात पिने

  • करपट ढेकर येणे

जर तुम्हाला सतत अनेक तास उचकी येत असेल किंवा अनेक दिवसांपासून अधूनमधून उचकी तुम्हाला त्रास देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

काही आयुर्वेदिक उपायांच्या मदतीनेही उचकी दूर करता येते. आयुर्वेदिक डॉक्टर नितिका कोहलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे शेअर केले आहे.

उचकी दूर करण्यासाठी उपाय

एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात सुमारे १ चमचा वेलची पूड घाला. हे पाणी १५ मिनिटे झाकून ठेवा जेणेकरून वेलची पावडर त्यात चांगली मिसळू शकेल. यानंतर पाणी फिल्टर करून नंतर कोमट प्यावे. थोड्या वेळाने उचकीमध्ये आराम मिळेल.

उचकी कशी थांबवावी(Remedies For Hiccups)

  • ही एक पद्धत आहे जी बऱ्याचदा घरांमध्ये वापरली जाते. एक चमचा साखर घेऊन हळूहळू चावताना खा. यामुळे उचकी देखील थांबू शकते.

  • थोडी काळी मिरी पावडर घ्या आणि त्याचा वास घ्या. यामुळे तुम्हाला शिंक येईल आणि शिंकल्यावर उचकी थांबू शकते.

  • जर एखाद्या मुलाला उचकी येत असेल तर त्याला एक चमचा गोड दही खायला द्या. तुम्हाला तात्काळ दिलासा मिळेल.

  • उचकी दूर करण्यासाठी ताज्या आल्याचा एक छोटा तुकडा घ्या. चघळताना खा. उचकी कमी होईल.

  • दीर्घ श्वास घेऊन थोडावेळ रोखून ठेवावा, जेणेकरून फुफ्फुसात हवा भरली जाईल व तत्काळ उचकी बंद होईल.

  • खडी साखर असेल तर चावून खावी, नंतर बसून पाणी प्यावे

  • मीठ साखर घालून पाणी प्यावे. तरीही जात नसेल तर कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करणे.

  • सुंठ पाण्यात उगाळून हुंगल्याने उचकी थांबते. आल्याचे लहान लहान तुकडे करून चघळावे.

  • पेटलेल्या कोळशावर कापूर टाकून हुंगल्याने उचकी थांबते.

  • सूर्यनमस्कार आणि प्राणायाम देखील उचकीमध्ये आराम देऊ शकतात. त्यामुळे जेव्हा उचकी येते तेव्हा तुम्ही हे देखील करू शकता.

घरगुती उपयांनी उचकी थांबत नसेल तर...

कधी कधी ४८ तास देखील उचकी तुम्हाला त्रस्त करू शकते. मात्र, असे वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. यावर घरगुती उपाय काम करणार नाहीत. तुम्हाला नेहमी उचकी लागत असेल तर अस्थमा, न्युमोनिया किंवा श्वासासंबंधी आजार होऊ शकतात.

अनेकदा हृदयामध्ये काही बिघाड झाला असेल तरी उचकी लागू शकते. पोटावर सूजन, गॅस होणे, हाइटस हार्निया यामुळे देखील उचकीची समस्या सुरू होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT