Skin Care esakal
लाइफस्टाइल

Skin Care : सौंदर्याच्या आड येतायेत चेहऱ्यावरचे अन्वाँटेड केस? ट्राय करा 'या' उपाय

चेहऱ्यावरचे अन्वाँटेड केस काढण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय आहेत. या उपायांनी तुम्हाला या त्रासापासून सुटका मिळू शकेल.

सकाळ डिजिटल टीम

चेहऱ्यावरील अन्वाँटेड केसांमुळे तुमचे सौंदर्य कमी होउ शकते. हे अन्वाँटेड केस काढण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरतात. महिला पार्लरमध्ये यासाठी फेस वॅक्स करतात. पण त्यामुळे चेहऱ्याला दुखते, रॅशेस येतात. पण हे अन्वाँटेड केस काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती उपायांविषयी सांगणार आहोत.

पपई आणि हळद

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी पपईची पेस्ट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. १ चमचा पपईची पेस्ट घ्यावी. त्यात चिमुटभर हळद मिक्स करा. तुम्हला हवे तर तुम्ही त्यात विटॅमिन ई ऑईल आणि ॲलोवेरा जेल मिक्स करावे. हे नीट फेटून घ्यावे. त्यानंतर हे चेहऱ्याला व मानेला लावावे. साधारण १५ मिनीट नंतर चेहऱ्याला हलक्या ओल्या हाताने रगडा. त्यानंतर चेहरा धुवावा. यामुळे केस कमी होउ शकतात.

केळं आणि ओट्सची पेस्ट

केळं व ओट्सच्या पेस्टने तुम्ही तुमच्या चेहऱ्याचे अन्वाँटेड केस काढू शकतात. हे मिश्रण तयार करण्यासाठी ओट्सची पावडर तयार करा. यात अर्ध केळ मिक्स करा. मग या मिश्रणाला चेहऱ्यावर लावून १५ मिनीट ठेवावे. यानंतर हलक्या बोटांनी रगडा. नंतर चेहऱ्याला साध्या पाण्याने धुवावे. यामुळे अन्वाँटेड केसांपासून सुटका मिळेल.

मध, साखर आणि लिंबू

अन्वाँटेड केस काढण्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे साखर, लिंबाचा रस व मध घेऊन त्याची पेस्ट करा. नंतर मिश्रण थोडे गार होऊ द्या. जेंव्हा पेस्ट गार व्हायला लागेल तेव्हा चेहऱ्यावर लावा. नंतर वॅक्स सारखे त् काढून टाका. यामुळे अन्वाँटेड केसांपासून सुटका मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT