Sai baba Temple esakal
लाइफस्टाइल

Sai baba Temple : साईबाबांच्या काळातील शिर्डी कशी होती? पहा शिर्डीचे जूने फोटो

साईंनी केवळ उपदेश दिला नाहीतर त्यांनी अनेक चमत्कारही घडवले

Pooja Karande-Kadam

Sai baba Temple : शिर्डीच्या साईबाबांचे मंदिर हे देशभरातील भाविकांचे श्रद्धा स्थान आहे. बाबांनी ‘सबका मालिक एक’या शिकवणीतून नेहमीच जातपात मानू नका, असाच संदेश दिला आहे. शिर्डीच्या साई दरबारात नेहमीच सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

साईबाबा नक्की कोण होते, ते कुठुन आले याची फारशी माहिती इतिहासालाही नाही. पण भाविकांच्या मान्यतेनुसार ते दैवी पुरूष होते आणि लोकांचे दु:ख दूर करण्यासाठीच साई प्रकटले होते, असे म्हटले जाते.  

साईबाबांच्या काळातील शिर्डी कशी होती, साईबाबा खरे कसे दिसायचे याबाबात भक्तांना उत्सुकता असते. त्यामुळेच शिर्डीचे जूने फोटो आपण पाहुयात.  

साईंच्या मंदिराबाहेरील परिसर

असे म्हणतात की, १८९८ मध्ये साई बाबा महाराष्ट्रातील शिर्डी गावात गेले आणि आयुष्यभर तिथेच राहिले. साई बाबा शिर्डीतील एका पडक्या मशिदीत राहत असत. साई बाबांचे भक्तांना कोणतेही बंधन नव्हते. अनेक जातीधर्माचे लोक त्यांच्याकडे यायचे. साई आमचे तारणहार असून आम्हाला प्रत्येक संकटातून वाचवतात अशी भक्तांची भावना होती.

साईंच्या गाभाऱ्याचे मूळ स्वरूप

साईंनी केवळ उपदेश दिला नाहीतर त्यांनी अनेक चमत्कारही घडवले. उकळत्या पातेल्यात हात घालून भक्तांना खीर वाढली, दिवाळीत पाण्याचे दिवे लावले, कुष्ठरोग्याला बरं केलं,असे अनेक चमत्कार साईंनी घडवले.

श्री हनुमान मंदिर परिसर
साईबाबांचा त्याकाळातील फोटो

आज 26 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र आणि गोवा एक दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजा करणार आहेत. महाराष्ट्रातील शिर्डी तीर्थक्षेत्राला दरवर्षी लाखो लोक भेट देतात.

शिर्डीतील मंदिर निर्मिती

साईबाबा नेहमी भक्तांच्या गराड्यात रहायचे. भक्तांनाही बाबांना सोडून जावंस वाटायचे नाही. त्यामुळे साईबाबा असतील तिथे भजन किर्तन सुरू असायचं.

भक्तांच्या गराड्यातील साईबाबा
साईबाबांचे भिक्षापात्र, जातं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT