Side Effects of Excess Water esakal
लाइफस्टाइल

Side Effects of Excess Water : उन्हाळा आहे म्हणून जास्त पाणी पिणे धोकादायक, असू शकतो हा गंभीर आजार?

जास्त पाणी पिण्येचेही Side Effects, वाचा एक्सपर्टचा सल्ला

Pooja Karande-Kadam

Side Effects of Excess Water : आपल्या शरीराचा आणि पृथ्वीचा जाद्यातर भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मानवी गरजांमध्ये प्रमुख असलेले पाणी हे आपले आरोग्याचा बॅलन्स बनवून ठेवते. पण, पाणी पिण्याचे काही नियम आहेत. जे आपल्या शरीराला आरोग्यदायी बनवतात.  

शरीराला डिहायड्रेशन पासून वाचवण्याचे आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम पाणी करते. त्यामुळे उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु या दरम्यान आपण जास्त पाणी पिणे देखील टाळले पाहिजे.

आरोग्य प्रशिक्षक आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियांका शेरावत यांनी दररोज किती पाणी प्यावे हे सांगितले. जेणेकरून त्यापासून होणारा त्रासाला आपल्याला सामोरे जायला लागणार नाही. तहान कशी लागते आणि जास्त पाणी पिण्याची सवय आऱोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकते हे जाणून घेऊया.

डॉ. प्रियांका म्हणाल्या की,आपल्या मेंदूत थ्रस्ट सेंटर असते. जेव्हा जेव्हा शरीरात पाण्याची पातळी कमी होते तेव्हा काही पेप्टाइड्स स्रावित होतात. जे थ्रस्ट सेंटरला सूचित करते की शरीराला पाण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याला तहान लागण्यास सुरवात होते.

तहान न लागता पाणी पिण्याच्या सवयीला सायकोजेनिक पॉलीडिप्सिया म्हणतात. डॉ. प्रियांका यांच्या म्हणण्यानुसार यामध्ये व्यक्ती तहान न लागताही दर 2-5 मिनिटांनी पाणी घेत राहते. हे शरीरासाठी अत्यंत हानिकारक असून शरीरातील द्रवपातळी जास्त होते.

सोडियमची कमी

Kidney.org (रे.) नुसार, शरीरात जास्त पाणी असल्यास सोडियमची पातळी खाली येते. यामुळे पेशींमध्ये जास्त पाणी पोहोचते आणि सूज येते. या अवस्थेला हायपोनाट्रेमिया म्हणतात, जे मेंदूसाठी विशेषतः हानिकारक आहे आणि त्या व्यक्तीस कोमात नेऊ शकते.

हायपोनाट्रेमियाची लक्षणे

  • मळमळ किंवा उलट्या

  • डोकेदुखी किंवा थकवा

  • कमी रक्तदाब

  • एनर्जी कमी होते

  • स्नायूंमध्ये कमकुवतपणा किंवा पेटके

  • चिंता किंवा राग येणे

24 तासात किती पाणी प्यावे?

प्रियांका शेरावत यांनी एका दिवसात किती पाणी लागते याची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, 24 तासात 2 ते 3 लिटर पाणी पिणे आपल्या शरीरासाठी पुरेसे आहे. तेवढेच पाणी प्या, त्या व्यतिरीक्त ज्यादा पाणी पिऊ नका. त्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलची वारी करावी लागेल. त्यामुळे याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच अती पाणी प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamaltai Gavai : संघाच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं, पण पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा; कमलताई गवई यांनी नेमकं काय म्हटलं?

FASTag नसल्यास १०० रुपयांऐवजी UPIने १२५ तर रोख २०० रुपये; टोलबाबत नवे नियम

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण भोवणार'; नेमके काेणत्या शेतकऱ्यांचे सरकारी लाभ बंद होण्याची शक्यता..

Vidarbha Tigers: सह्याद्रीत घुमणार विदर्भातील वाघांची डरकाळी! स्थानांतरणास हिरवा कंदील, वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT