Sweaty pores sakal
लाइफस्टाइल

उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होतोय, हे पाच उपाय नक्की करा

घामोळ्यांमुळे त्वचेवर रॅशेस, त्वचा लाल होणे, खाज येणे यामुळे भयानक त्रास होतो.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रसह देशभरात उन्हाचा कडाका वाढलाय. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागेत. त्यात घामोळ्यांचाही त्रास होणे खुप स्वाभाविक झाले आहेत. या घामोळ्यांमुळे त्वचेवर रॅशेस, त्वचा लाल होणे, खाज येणे यामुळे भयानक त्रास होतो. यासाठी आपण अनेक तात्पुरते पर्याय म्हणून अनेक उत्पादने वापरतो. मात्र कधी कधी हे उत्पादनापासून रिॲक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे काही घरगुती उपचारांनी घामोळ्यांची समस्या कमी करण्यास मदत होते. त्यातील काही सोपे घरघुती उपचार जाणून घेऊया. (Sweaty pores found a lot in summer check some easy tips)

कडूलिंब -

कडूलिंबाच्या पानांनी त्वचेचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. कडूलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून लावल्याने घामोळयांची समस्या दूर होते. तसेच सकाळी अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पानं उकळवून त्याने अंघोळ केल्यानेही फायदा होतो.

बेकिंग सोडा -

बेकिंग सोड्यात पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करुन घामोळ्या आलेल्या जागेवर १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवा. हा उपायाने घामोळयांची समस्या दूर होते.

मुलतानी माती -

मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्र करुन प्रभावित जागेवर लावा सुकल्यानंतर धुवून टाका. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा लावा. तुम्हाला प्रभाव दिसून येईल.

कच्चा बटाटा -

कच्च्या बटाट्याच्या रसात गुलाब पाणी मिसळून घामोळ्या आलेल्या ठिकाणी लावावे. २० मिनिटानंतर साध्या पाण्याने धुवून टाका.

चंदन पावडर -

चंदन पावडर आणि गुलाब जल एकत्र करून ही पेस्ट २० ते २५ मिनिटे घामोळ्यांवर लावून ठेवल्यानेही घामोळयांची समस्या दूर होते.

याशिवाय सैलसर आणि सुती कपडे घाला त्यामुळे त्वचा घामाने ओलसर होणार नाही.

जास्तीत जास्त थंड व कोरड्या वातावरणात राहावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे आणि कलिंगड, खरबूज, काकडी अशी पाणीदार फळे खावीत

एखाद्या ठिकाणी घामोळ्या येण्यास सुरुवात झाली आहे असे वाटल्यास त्याठिकाणी कोरफडीचा गर लावणे किंवा थंड पाण्याने तो भाग धुणे यामुळे खाज कमी होण्यात मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी देवीच्या 4 हजार एकर इनामी जमीन घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT