Symptoms Of Weak Muscles
Symptoms Of Weak Muscles  esakal
लाइफस्टाइल

Symptoms Of Weak Muscles : स्नायूंच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका, स्वामी रामदेवांनी सांगितली कारणं आणि उपाय!

Pooja Karande-Kadam

Symptoms Of Weak Muscles : आयुष्यभर जरी आपण निरोगी राहीलो तरी वयाचा एक टप्पा असो असतो जेव्हा आपलं शरीर आपली साथ देत नाही. जेव्हा आपल्याला चालणंही मुश्किल होतं तेव्हा आपल्याला वय झालंय हे प्रकर्षानं जाणवंत. जेव्हा आपल्या स्नायूंच दुखणं सुरू होतं त्याला सारकोपेनिया म्हणतात.

अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, हाडांची झीज होते आपल्या शरीरातील अनेक भागांतून वेदना जाणवायला लागतात. स्नायूंची झपाट्याने झीज झाल्यामुळे, रुग्ण त्याच्या वयाच्या आधी म्हातारा दिसू लागतो. त्याला इतका अशक्तपणा येतो की बाटलीचे झाकनही सहज उघडता येत नाही.

जगातील 50 दशलक्षाहून अधिक लोकांना हा आजार आहे, ज्यामुळे पुढील 40 वर्षांमध्ये सुमारे 200 दशलक्ष लोक या आजाराचे बळी ठरतील. आणि ही खेदाची बाब आहे की भारत आपल्या रुग्णांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर आहे.(Symptoms Of Weak Muscles : Do not ignore these symptoms of weak muscles, know the reasons and home remedies from Swami Ramdev)

देशातील प्रत्येक तिसर्‍या पुरुषाला आणि पाचव्या स्त्रीला सारकोपेनिया आहे. देशातील 70% लोक या आजाराने त्रस्त आहेत. स्नायूंशी संबंधित सर्व रोग आहेत. ही परिस्थिती आहे कारण लोकांना त्यांच्या स्नायूंच्या नुकसानाबद्दल देखील माहिती नसते.तर शरीराची हालचाल आणि अवयवांची तंदुरुस्ती या दोन्हीमध्ये स्नायूंची भूमिका खूप महत्वाची असते.

सोमवार आला की आठवड्याच्या शेड्युलची सुरूवात होते. हृदय, मेंदू, फुफ्फुसे, यकृत, मज्जासंस्था या सर्वांवर ताण येतो. सतत थकवा आणि शरीरदुखी असते. स्नायूंच्या कमकुवतपणामुळे ऊर्जा आणि एक्टीव्हिटी कमी होऊ लागतात. अपघात किंवा घसरल्याने हाड तुटण्याचा धोका वाढू शकतो. (Health Tips)

वयाच्या 40 वर्षांनंतर दर 10 वर्षात 3 ते 8% स्नायूंची झीज होते. वयाच्या 25-30 व्या वर्षी सारकोपेनिया शरीराला वेळेआधी कमकुवत करते. अशा स्थितीत शरीराला बळकट करण्यासाठी योगापेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही. आणि योगा कसा करायचा. हे स्वामी रामदेव यांच्यापेक्षा चांगले कोणीही शिकवू शकत नाही.

स्वामी रामदेव सतत लोकांना हाडांच्या सापळ्यापासून बनलेलं आपलं शरीर सांभाळण्याचा सल्ला देतात. शरीरावर असलेली अतिरिक्त चरबी कमी करण्याबद्दलही ते बोलत असतात. लोकांमधील विविध रोगांवर ते उपचार करत असतात. योगाचा प्रसार जगभर करून लोकांना त्याचे महत्त्व पटवून देत असतात.

कमकुवत स्नायू केस ओळखावेत

  • पायांमध्ये असलेला अशक्तपणा

  • चालणे, धावणे त्रासदायक वाटते

  • लवकर थकवा येतो

स्नायूंमध्ये होणारे आजार समस्या

  • मस्कुलर डिस्ट्रॉफी

  • स्नायूंमधील सूज

  • स्नायूंमधील कडकपणा

  • शरीराचे असंतुलन (Muscles)

स्नायूंचा कमकुवतपणा कसा कमी करायता

  • दररोज व्यायाम करा

  • व्हिटॅमिन-डी असलेले अन्न खा

  • दिवसातून 4-5 लिटर पाणी प्या

  • आवळ्याचे सेवन करा

स्नायू कसे मजबूत कराल

  • नियमितपणे योगा करा

  • व्यायाम

  • कार्डिओ करा

  • निरोगी आहार घ्या

  • भरपूर झोप घ्या (Baba Ramdev)

स्नायू कमकुवत होण्याची कारणे काय आहेत

  • शरीरात अशक्तपणा

  • नसांवर येणारा ताण

  • अनुवांशिक विकार

  • स्वयंप्रतिरोधक रोग

  • संसर्ग

स्नायूंच्या दुखण्यावर काय उपाय आहेत

  • फेरफटका मारणे

  • दररोज दूध प्या

  • ताजी फळे खा

  • हिरव्या भाज्या खा

  • जास्त एका जागी वेळ बसू नका

  • शरीरातील फॅट कमी करा

  • व्यायाम

  • जंक फूड खाणं बंद करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT