TB Champions 5 girls to make India TB free World Tuberculosis Day 2022
TB Champions 5 girls to make India TB free World Tuberculosis Day 2022 
लाइफस्टाइल

TB Champions : 5 मुली भारताला करणार टीबीमुक्त, 'अशी' करतायेत जनजागृती

सकाळ डिजिटल टीम

World Tuberculosis Day 2022: क्षयरोगासंदर्भात(Tuberculosis -TB) लोकांमध्ये जनजागृती पसरविण्यासाठी दरवर्षी २४ मार्चला जागतिक क्षयरोग दिन साजरा (World Tuberculosis Day) केला जातो. दरवर्षी यासाठी एक थीम ठरवली जाते. यंदा ‘इनवेस्ट टू एन्ड टीबी, सेव्ह लाईफ’ (Invest to End TB, Save Lives) अशी आहे. जगभरामध्ये क्षयरोगामुळे लाखो लोकांचा जीव जातो. भारतामध्ये टीबीच्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे.

क्षयरोगाच्या रुग्णांच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की लोकांमध्ये अद्याप या आजाराबद्दल माहिती नाही. आजही अनेक टीबी रुग्णांना खूप काही ऐकून घ्यावे लागते आणि त्यांना आधार देण्याऐवजी ट्रोल केले जाते. पण काही मुलींनी ट्रोल्सना पटवून देण्यासाठी आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी क्रिएटिव्ही पद्धतीने टीबीबद्दल जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे.

खरं तर, डिसेंबर 2021 मध्ये रिलीज झालेल्या व्हिडिओमध्ये हर्षिता, साबा, शबनम, आरती आणि तनुजा नावाच्या मुली एका गाण्यावर नाचताना दिसल्या होत्या. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे हे गाणे क्षयरोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

टीबी चॅम्पियन्स जनजागृती करत आहेत

या मुलींपैकी तनुजा आणि शबनम या टीबी सर्व्हायव्हर्स आहेत किंवा त्यांना टीबी चॅम्पियन देखील म्हणता येईल. तर साबा आणि आरतीच्या जवळच्यांना टीबी झाला.या सर्वांनी टीबीमुक्त भारताचे स्वप्न पाहताना “गंदी लड़की” या गाण्यातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, टीबीची तपासणी आणि उपचार मोफत आहेत.

माहितीनुसार, या गाण्याची लिरिक्स हर्षिताने लिहले आहे. या गाण्याचा मागील किस्सा सांगताना हर्षिता म्हणाली की, टीबीमुक्तीसाठी ती सोशल मीडियावर जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होता आणि ट्रोलर्स तिला ट्रोल करत होते तेव्हा तिला या गाण्याची कल्पना सुचली.

हर्षिता, सेंटर फॉर पब्लिक हेल्थ किनेटिक्स, नवी दिल्ली येथील संशोधन शास्त्रज्ञ, तिने 2015 मध्ये तिची 'क्रिएटिव्ह अॅडव्होकेसी' सुरू केली, जेव्हा तिने 'आय वॉना स्टॉप टीबी' हे पहिले गाणे रिलीज केले. त्यानंतर त्यांनी 'निक्षय एंथम' लिहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करण्याचे आवाहन केले तेव्हापासून त्यांनी यावर काम करण्यास सुरुवात केली.

आपल्या अनुभवातून करतात दुसऱ्यांना मदत

हर्षिताकडून मिळालेल्या माहितीनुसार, ''सोशल मीडिया अकाऊंटवर लोक तिच्या कामाबद्दल असभ्य कमेंट करू लागले. हर्षिताने न्यूज18 ला सांगितले की, हा तो काळ होता जेव्हा तिने ‘तू क्या 'टीबी रोकेगी, तू गंदी लड़की है!’ हे गाणे लिहिले. त्यानंतर त्यांनी विचार केला की हे गाणे टीबीशी संबंधित कलंकावर लक्ष केंद्रित करू शकते कारण टीबी हा एक भयानक आजार मानला जातो आणि महिलांना याचा सर्वाधिक त्रास होतो. त्यानंतर 'टच्ड बाय टीबी'च्या माध्यमातून ती सबा, शबनम, आरती आणि तनुजा यांच्या संपर्कात आली. ‘टच्ड बाय टीबी’ हा टीबी सर्वाइवर्स किंवा ‘टीबी चॅम्पियन्स’चा एक ग्रुप आहे जिथे लोक त्यांचे अनुभव शेअर करतात आणि रोगाबद्दल जागरूकता पसरवतात.

भीतीमुळे उपचारात विलंब होऊ शकतो

जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्राइमरी केअरमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, टीबीच्या चाचणीत विलंब झाल्यास संसर्गाचा कालावधी वाढू शकतो, उपचारास विलंब होतो आणि रोगाची तीव्रता वाढते. हर्षिता सांगते की, ‘टीबी असलेली व्यक्ती भेदभावाच्या भीतीने मदत घेऊ शकत नाही, ज्यामुळे उपचारांना उशीर होऊ शकतो. उपचारासाठी उशीर केल्यांमुळे हा रोग वाढवतो. कलंक मानले जात असल्यामुळे क्षयरोग झालेल्या व्यक्ती उपचार थांबवितात. क्षयरोगाचा उपचार शक्य आहे, विशेषत: तो लवकर आढळल्यास. तर फुफ्फुसावर परिणाम करणारा फुफ्फुसाचा टीबी हा संसर्गजन्य आहे. एक्स्ट्रा पल्मोनरी टीबी (ईपीटीबी) नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT