love marriage divorce 
लाइफस्टाइल

Love Marriage नंतरही घटस्फोट का होतो? ही आहेत ४ कारणे

काहीजण कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह करतात.

सकाळ डिजिटल टीम

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा टप्पा असतो. काही मुलं आईवडिलांनी पसंत केलेल्या मुला-मुलीशी लग्न (Marriage)करतात. तर काहीजण प्रेमविवाह करतात. पण प्रेमविवाहात दोन्ही कुटूंबात खूप फरक असतो. त्यामुळे दोघांनाही एडजस्ट करणे कठीण जाते. एका अभ्यासात म्हटले आहे की लोकांना आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करायचे असते. पण, कौटुंबिक दबावामुळे ते प्रेमविवाह करू शकत नाहीत. पण तरीही कुटूंबाच्या विरोधात जाऊन ते लग्न करतात, लग्नानंतर त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतात, ज्यामुळे त्यांचे नाते (Relation) कमकुवत होऊ लागते. अशा जोडप्यांचे लग्न लवकर का तुटते त्याची काही कारणे आहेत.

ही आहेत चार कारणे

कुटुंबाचा नकार- अनेकदा प्रेमविवाह करायला कुटूंबाचा नकार असतो. पण तरीही मुलांच्या आनंदासाठी असे लग्न केले जाते. पण एकमेकांविषयी थोडासा राग असतोच. किंवा काहीही बोलणं नको वाटतं. एकाच घरात खूप काळ राहूनही त्या व्यक्तीचा स्विकार करणे कठीण जाते. त्यामुळे या नात्यात प्रेम नसते. अशावेळी नवरा बायकोतही घुसमट वाढत जाते. त्यामुळे लग्न खूप काळ निभावणे कठीण जाते.

एकमेकांसाठी वेळ कमी - लग्नाआधी कपल्स एकमेकांना खूप वेळ देतात. रोज विविध गोष्टींवर चर्चा करतात. गप्पांमध्ये कसा वेळ गेला त्यांना कळतही नाही. पण लग्नानंतर याच गोष्टी कशा बदलतात ते त्यांना कळत नाही. प्रेम विवाहात कपल्स एकमेकांना आधीपासून ओळखत असतात. त्यामुळे लग्नानंतर त्यांना तसा नवेपणा काहीच वाटत नाही. त्यामुळे रोज एकमेकांबरोबर वेळ घालवल्यानंतर दोघांमध्ये भांडणं व्हायला लागतात.

couple arguments

आदर कमी देणे - अरेंज्ड असो की लव्ह मॅरेज असो, ज्या नात्यात आदर नसतो, त्यांचे नाते जास्त काळ टिकणे कठीण असते. प्रेमविवाहात जोडपी एकमेकांशी स्पष्टपणे वागतात. ते एकमेकांना टोपण नावानेच हाक मारतात. कधीकधी ते एकमेकांच्या भावनांची पर्वा करत नाहीत. कारण अशाप्रकारच्या लग्नात पार्टनर्स एकमेकांचा आदर करण्यापेक्षा अहंकाराला जास्त महत्व देतात. त्यामुळे नात्यावर परिणाम होतो.

marriage

घाईघाईत लग्न - कपल्स पार्टनरला फार न ओळखताच त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतात. अशाप्रकारे लग्न करताना कुटुंबातील माणसांना फार महत्व दिले जात नाही. त्यामुळे समोरच्याची संपूर्ण पार्श्वभूमी समजून न घेताच लग्न केले जाते. लग्नानंतर रोजचे आयुष्य सुरू झाल्यावर खरी परिस्थिती समोर येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT