Trending
Trending  esakal
लाइफस्टाइल

Trending : हिवाळ्यात भुरका मारत सापाचे सूप का पीत आहेत चिनी लोक?

Pooja Karande-Kadam

Trending :

हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते. त्यामुळे सगळेच लोक काही ना काही उबदार पदार्थ खात असतात. हिवाळ्यात लहान मुलांसह सगळ्यांनाच आवडतील असे सूप्सचे अनेक प्रकारही घरोघरी बनवले जातात.  हे सूप व्हेजही असते अन् नॉनव्हेजही. पण चिनचे लोक हिवाळ्यात चक्क सापापासून बनलेले सूप पितात.

सापाचं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या अंगाचा थरकाप होतो. पण काही लोक बिंधास्त त्याला पकडतात. त्याच्यासोबत खेळ करतात. हे पकडण्या इतपत ठीक होतं. पण, आता लोक साप खायलाही लागले आहेत. सापापासून बनलेले सूप चिनमध्ये फेमस आहे. हे असं करण्यामागील कारण काय आहे जाणून घेऊयात.  

सहसा लोक चिकन सूप पितात, पण इथले लोक स्नेक सूप पितात. रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वी, पिझ्झा हट आणि हाँगकाँगच्या सर्वात जास्त काळ चालणाऱ्या 'स्नेक रेस्टॉरंट'पैकी एक असलेल्या सेर वोंग फनने लॉन्च केलेल्या स्नेक-सूप पिझ्झाची बरीच चर्चा झाली. आणि ते पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला होता की हे सेवन करणे सुरक्षित आहे का आणि त्याची चव कशी असेल?

असे म्हटले जात आहे की ही एक कँटोनीज डिश आहे, जी चीनमध्ये विशेषतः हिवाळ्याच्या काळात खूप लोकप्रिय आहे. लोकांचे म्हणणे आहे की सापाचे सूप योग्य पद्धतीने तयार केलं तर त्याचा वास आणि चव अगदी परफेक्ट होते.

रेसिपी आहे हजारो वर्षे जुनी

तज्ञांच्या मते, स्नेक सूप हजारो वर्षांपासून दक्षिण चीनमधील परंपरागत पाककृतीचा एक भाग आहे. ही रेसिपी जियांग कॉंग्यिन (1864-1952) यांनी लोकप्रिय केली होती, जो किंग राजवंशातील शेवटच्या शाही विद्वानांपैकी एक आणि ग्वांगझूचा मूळ रहिवासी होता.

त्या वेळी, स्नेक सूपने ग्वांगडोंग प्रांतातील सर्वोत्कृष्ट स्वादिष्ट पदार्थाचा किताब जिंकला होता. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

सापाचे सूप आरोग्यदायी का मानले जाते?

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, सेर वोंग फन रेस्टॉरंटचे चौथ्या पिढीचे मालक गिगी एनजी यांच्या मते,  'सापाचे सूप हान या राजघराण्यापासून वापरले जात आहे. हे आरोग्यदायी मानले जाते कारण ते अनेक महत्त्वाच्या चिनी वैद्यकीय सूत्रांमध्ये वापरले जाते.

स्नेक सूप जीवनसत्त्वे आणि प्रथिने समृद्ध असल्याचे म्हटले जाते आणि झोप सुधारणे आणि कर्करोगासारख्या असाध्य आजाराला रोखण्याची ताकदही या पदार्थात आहे, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इलेक्टोरल बाँड्स खरेदीत दोन नंबरवर असणाऱ्या कंपनीला राज्यातील महत्वाची कंत्राटे

Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलने बुडवली RCBची बोट... एक रन काढण्यासाठी मोजले तब्बल २१ लाख

Buddha Purnima 2024 : बाबासाहेबांनी केली होती बुद्ध जयंतीला सुट्टीची मागणी

HSC Result 2024 : भलामोठा डोंगर चढून केली पायपीट अन् लेकीसोबत मिळवलं बारावीच्या परीक्षेत यश

राज्यात 3 दिवसात 13 जणांना जलसमाधी; जाणून घ्या कुठे काय झालं?

SCROLL FOR NEXT