video of the bride and groom dancing to Pushpa song o Antava Goes Viral 
लाइफस्टाइल

Pushpaच्या 'उ अंतवा' गाण्यावर नवरा-नवरीचा जबरदस्त डान्स Viral!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) चा तेलगू चित्रपट 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) प्रदर्शित झाल्यापासून धुमाकूळ घातला आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट ठरलेल्या पुष्पा चित्रपटातील गाणी, डॉयलॉग सर्वच सुपरहिट ठरत आहे. आता पर्यंत पुप्षा चित्रपटातील गाणी व्हायरल होत असून अल्लू अर्जूनचा डान्स आणि डॉयलॉग्स लिप-सिंक करतानाचे कित्येक व्हिडिओ आणि रिल्स शेअर होत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये नवरा-नवरी (bride and groom) पुष्पाच्या 'उ अंतवा’ (Pushpa song o Antava)आइटम साँगवर नाचताना दिसत असून हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ (Video) खूप मजेशीर असून सर्वांना हा डान्स (Dance) व्हिडिओ पाहायला आवडत आहे. (video of the bride and groom dancing to Pushpa song o Antava Goes Viral)

व्हायरल व्हिडिओमध्ये प्राची मोरे आणि रोनक शिंदे नावाचे नवरा नवरी मगंलअष्टकांपूर्वी लग्नातील मिरवणूकीत दरम्यान गाण्यांवर बिनधास्तपणे थिरकत आहेत. या व्हिडिओमध्ये पारंपारिक मराठी पेहरावामध्ये दिसत असून दोघांनी पुष्पाच्या 'उ अंतवा’ गाण्याच्या हुक स्टेप डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नवरा नवरी सोबत लग्नातील पाहूणे देखील नाचताना दिसत आहे.

इंस्टाग्रामवर केमिस्ट्री स्टूडियोज या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून त्यांनी कॅप्शन दिले आहे की, टटआम्ही सर्वात जास्त भारी नवरीचा व्हिडिओ कव्हर केला आहे.''

हा व्हिडिओ ऑनलाईन शेअर केल्यावर २.३ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. कपलचा डान्स पाहून लोक थक्क झाले आहेत आणि कित्येकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

उ अंतवा अल्लू हे अजुर्न आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा: द राइज या लोकप्रिय चित्रपटातील गाणे आहे. या गाण्यामध्ये सामंथा प्रभु आहे आणि हे गाणे इंद्रावती चौहान हिने गायले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो

Paithan News : पैठणमध्ये नगर पालिका निवडणुकीआधी जादुटोण्याचा धक्कादायक प्रकार; महिला उमेदवाराच्या घरासमोर अघोरी साहित्य!

Nitish Kumar Hijab Incident : हिजाब घटनेनंतर नितीश कुमारांच्या जीवाला धोका? ; यंत्रणांनी सुरक्षा वाढवली!

Crime: भयंकर! ४० वर्षीय प्रेयसीला २७ वर्षीय प्रियकराकडून मूल हवं होतं; तरुणाच्या पत्नीला कळलं अन् भलतंच कांड घडलं!

SCROLL FOR NEXT