Water In Copper Vessel
Water In Copper Vessel esakal
लाइफस्टाइल

Water In Copper Vessel : तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या पण जरा जपून,कारण..

Pooja Karande-Kadam

Water In Copper Vessel: तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याची प्रथा आजपासून नाही, तर वर्षानुवर्षे जुनी आहे. पूर्वीच्या काळी लोक स्टीलऐवजी तांब्याची किंवा पितळाची भांडी वापरत असत. तांब्याच्या भांड्याचे फायदे लक्षात घेता आजही तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे अनेकांना आवडते. बाजारात अनेक प्रकारची स्टायलिश भांडीही पाहायला मिळतील.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील वात, पित्त आणि कफ यांचा समतोल राखला जातो, ज्यामुळे शरीराचे सर्व रोगांपासून संरक्षण होते, असे आयुर्वेदात मानले जाते. निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. रमाकांत शर्मा म्हणतात की तांब्याच्या भांड्यांचा चांगला फायदा घेण्यासाठी त्याचे काही नियम जाणून घेणे आवश्यक आहे, तसेच काही चुका करणे टाळणे आवश्यक आहे, अन्यथा आपली तब्बेत बिघडू शकते.

ते चार्ज केलेले पाणी आहे

डॉ. रमाकांत यांच्या मते तांब्याच्या भांड्याच्या पाण्याला चार्ज्ड वॉटर म्हणतात. ते पिण्यासाठी भांड्यात कमीत कमी ७ ते ८ तास ठेवा. यामुळे तांब्याचे सर्व गुणधर्म पाण्यात येतात. पण तांब्याची भांडीही जमिनीवर ठेऊ नका. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवताना ते भांडे लाकडी पाटीवर किंवा टेबलावर ठेवावे.

सकाळी रिकाम्या पोटी पिणे चांगले

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी केव्हाही पिता येत असले तरी सकाळी रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे अधिक आहेत. रात्री झोपताना तांब्याचे भांडे स्वच्छ करून लाकडी पाटावर सुमारे एक ते दीड लिटर पाणी ठेवावे. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे. यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल.

दिवसभर पाणी पिऊ नका

जर तुम्ही दिवसभर तांब्याच्या बाटलीत किंवा भांड्यात ठेवलेले पाणी पीत असाल तर तुमच्या शरीरात तांब्याचे प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते. यामुळे लिव्हर आणि किडनी निकामी होण्याच्या धोक्यासोबतच गंभीर मळमळ, चक्कर येणे, पोटात दुखणे या समस्या देखील होऊ शकतात.

हे करू नका
हे अगदी खरे आहे की सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध मिसळलेले पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पण तांब्याच्या भांड्यात लिंबू व मध घातलेले हे पाणी प्यायल्यावर ते विषासारखे काम करते. वास्तविक, लिंबूमध्ये आढळणारे अॅसिड तांब्यासोबत मिक्स होऊन शरीरात अॅसिड तयार होते, ज्यामुळे पोटदुखी, पोटात गॅस आणि उलट्या होण्याचा धोका असतो.

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे

  • हे पाणी पोटाच्या समस्या दूर करणारे मानले जाते. तसेच पोटाच्या आतड्यात जमा झालेली घाण साफ होते आणि गॅस, अॅसिडिटी आदी समस्यांपासून मुक्ती मिळते.

  • तांबे रक्त शुद्ध करण्याचे काम करते. हे पाणी प्यायल्याने त्वचेशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो. .

  • तांब्याच्या पाण्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे संधिवाताच्या समस्येपासून संरक्षण करतात.

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे तोटे

  • यात अँटी कॅन्सर घटक असतात, जे या जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त मानले जातात.

  • या चुका कधीही करू नका.

  • जे अॅसिडिटीचे पेशंट आहेत त्यांनी हे पाणी कधीही पिऊ नये, अन्यथा चार्ज केल्यानंतर तांब्याचे पाणी गरम झाल्याने समस्या वाढेल.

  • मूत्रपिंड किंवा हृदयाचे रुग्ण असतील तर हे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • पाण्याव्यतिरिक्त तांब्याच्या भांड्यात दूध, आंबट पदार्थ वगैरे इतर कोणतीही वस्तू खायला विसरू नका. यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

MS Dhoni : MS धोनीमुळे हरली CSK? 'या' मोठ्या चुकीमुळे प्लेऑफचे तिकीट गेलं हातातून

Nancy Tyagi: 30 दिवस, 1000 मीटर कापड अन् 20 किलो वजन; कान चित्रपट महोत्सवात परिधान केला स्वत: शिवलेला ड्रेस, नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT