curd for weight loss
curd for weight loss Esakal
लाइफस्टाइल

Weight Loss: पोटाची वाढलेली चरबी कमी करायचीय? मग Curd चे या पद्धतीने करा सेवन आणि पहा जादू

Kirti Wadkar

Curd for Weight Loss: वाढतं वजन ही दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या बनली आहे. अलिकडे बदललेली जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे Wrong Diet वजन वाढण्याची Weight Gain शक्यता अधिक वाढतेय.

तर काहींच्या बाबतीत हार्मोनल बॅलेन्स बिघडल्याने किंवा काही अनुवांशिक आजार असल्यानेही वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. Weight Loss Tips Marathi Eat Curd in your Diet regularly

मात्र बऱ्याचदा सक्रिय जीवनशैली Lifestyle, हेल्दी डाएट आणि पुरेसा व्यायाम यामुळे वजन कमी करणं शक्य आहे. वजन कमी करण्याचा तर अनेकजण संकल्प करतात. मात्र त्यासाठी योग्य डाएट घेत नाहीत.

वजन कमी Weight Loss करायचं म्हटलं तर कार्बोहायड्रेट आणि फॅट्स कमी असतील असा आहार Diet घेणं गरजेचं आहे. मात्र याचवेळी शरीराला पुरेस प्रोटीन मिळेल याची देखील काळजी घेतली गेली पाहिजे. यासाठीच आहारात दह्याचा Curd समावेश वाढवणं अधिक गरजेचं आहे. 

वजन कमी करण्यासाठी दही फायदेशीर

दह्यामध्ये पुरेश्या प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन बी १२, विटामिन बी-२, पोटॅशियम  आणि मॅग्नेशियम उपलब्ध असतं. त्यासोबतच महत्वाची बाब म्हणजे दही एक प्रोबायोटिक आहे.

म्हणजेच यामध्ये चांगले बॅक्टेरिया आढळतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. दह्यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. शरीरात मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचय क्रिया जलद झाली की वजनही कमी होवू लागतं. 

म्हणूनच वजन कमी करण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये दह्याचा समावेश असणं गरजेचं आहे. अनेकांना दूध किंवा दूग्धजन्य पदार्थांची एलर्जी असते.

म्हणजेच त्यांना लॅक्टोज इंटॉलरन्सची समस्या असते. मात्र दही हे फर्मेंटेड म्हणजेच आंबवलेलं असतं. त्यामुळे लॅक्टोज इंटॉलरेंसच्या समस्या दूर होते. म्हणजे असे लोकही दह्याचं सेवन करू शकतात. 

हे देखिल वाचा-

दह्यामुळे वजन कसं कमी होईल

दुग्धजन्य पदार्थांमध्ये दही हा एकमेव असा पदार्थ आहे जो लॅक्टोज इंटॉलरेंसच्या समस्येपीसबन मुक्त आहे. दही हे बॅक्ट्रियम बॅक्टेरियाद्वारे आंबवलं जातं जे लैक्टोजचं रुपांतर लैक्टिक ऍसिडमध्ये करतं. यामुळे दही चयापचय क्रिया जलद करत आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारते. 

यासोबतच दह्यामध्ये कमी कॅलरीज Calories असतात आणि प्रोटीनचं प्रमाण अधिक असतं. यामुळे शरीराला आवश्यक एनर्जी मिळते मात्र वजन वाढत नाही.

२८ ग्रॅम दह्यामध्ये १२ ग्रॅम प्रोटीन असतं. प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्याने तुम्ही दह्याचं सेवन केल्यानंतर तुम्हाला बराच वेळ भूक लागणार नाही. यामुळे हळू हळू पोटाची चरबी कमी होवू लागेल. 

हे देखिल वाचा-

ब्लड शुगरची समस्या होईल दूर

दह्यामध्ये दुधातील सर्व पोषक तत्व आढळतात. सोबतच यात लॅक्टिक ऍसिड निर्माण झाल्याने पचनास मदत होते. दह्यातील पोषक तत्व पेशींमध्ये पाण्याचे प्रमाण वाढवतात. यामुळे पेशींचं पाणी शेवटी मूत्राशयात जातं.

पेशींमध्ये पाण्याचं प्रमाण वाढलं की रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होवू लागतं. यामुळे दह्याचं सेवन मधूमेह नियंत्रणात राखण्यास फायदेशीर ठरतं. 

कसं करावं दह्याचं सेवन

तुम्ही रोज नाश्त्यामध्ये दह्याचा समावेश करू शकता. तुम्ही सलादमध्ये देखील दह्याचा वापर करु शकता. यासाठी तुम्ही दह्याच काकडी, केळ, सफरचंद किंवा संत्री  अशी फळं टाकून सलाड बनवून खावू शकता. 

तसचं एक कप दह्यामध्ये चमचाभर मध मिसळून खाल्ल्यासही फायदा होतो. तुम्ही दह्यामध्ये बदाम टाकूनही त्याचं सेवन करू शकता. 

जर तुम्ही वजन किंवा पोट कमी करण्यासाठी दह्याचं सेवन करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं मात्र गरजेचं आहे. सुर्यास्तानंतर किंवा रात्री उशीरा दह्याचं सेवन करू नये. तसचं फ्रिजमधील जास्त गार दह्याचं सेवन टाळावं. नियमित दही खात असाल तर त्यात दररोज साखर टाकून खाणं टाळावं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara : पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT