Benefits Of Dragon Fruit
Benefits Of Dragon Fruit Esakal
लाइफस्टाइल

Benefits Of Dragon Fruit : 'ड्रॅगन फ्रुट' नेमकं काय आहे? एकाच फळातून मिळतात भरपूर फायदे

Monika Lonkar –Kumbhar

Health Benefits of Dragon Fruit : आहारात फळांचा समावेश केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. फळांमध्ये पोषकघटकांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे, प्रत्येक सिझनला मिळणाऱ्या फळांचा आहारात अवश्य समावेश करावा. आंबा, पेरू, सफरचंद, केळी, किवी, चिकू इत्यादी अनेक फळे आपण खातो

बाजारात गेल्यावर एखादं वेगळं दिसणारं काटेरी फळ तुम्ही कधी पाहिलयं का? कदाचित पाहिलं ही असेल. हे फळ बाहेरून दिसायला गुलाबी आणि आतून पांढरे दिसते. ज्यामध्ये काळ्या बिया देखील असतात. या फळाचे नाव आहे 'ड्रॅगन फ्रूट'.

अनेकांच्या आहारामध्ये या फळाचा जरूर समावेश असतो. हे फळ दिसायाल वेगळे असल्यामुळे अनेकांना या फळाबद्दल उत्सुकता असते. वेगळे दिसण्यासोबतच याचे आपल्या आरोग्याला होणारे फायदे देखील आश्चर्यकारक आहेत. आज आपण ड्रॅगन फ्रूट आहे तरी काय ? आणि त्याचे आरोग्याला होणारे फायदे कोणते ? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

ड्रॅगन फ्रूट काय आहे ?

ड्रॅगन फ्रूट हे जंगली कॅक्टसची एक प्रजाती आहे. ही प्रजाती प्रामुख्याने दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेमध्ये आढळून येते. जगातील अनेक देशांमध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती केली जाते. आपल्या भारतातही या फळाची लागवड केली जाते.

लॅटिन अमेरिकन देशांमध्ये या फळाला ‘वडिल’ (Father) असे ही म्हटले जाते. किवी फळामध्ये आढळून येणाऱ्या बिया ड्रॅगन फ्रूटमध्ये ही आढळून येतात.

ड्रॅगन फ्रूट हे फळ काही स्थलांतरितांच्या मदतीने १९ व्या शतकामध्ये व्हिएतनाम या देशात पोहचले. व्हिएतनाममध्ये या फळाला ‘थान लॉंग’ म्हणजेच ‘ड्रॅगनचे डोळे’ असे ही म्हटले जाते.

आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या या ड्रॅगन फ्रूटचा सर्वात मोठा उत्पादक आणि सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून आज व्हिएतनामची जगभरात ओळख आहे.

ड्रॅगन फ्रूटचे आरोग्याला होणारे फायदे कोणते ?

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते

शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की, हृदयविकाराचा धोका संभावण्याची शक्यता असते. त्यामुळे, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ड्रॅगन फ्रूटचा आहारात अवश्य समावेश करा.

पोटाच्या विकारांसाठी लाभदायी

ड्रॅगन फ्रूटमध्ये आढळून येणाऱ्या ओलिगोसॅकराईड्समुळे (संयुग) आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. या गुणधर्मांमुळे आपली पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. तसेच, पोटाच्या समस्यांवर आराम मिळतो. ज्यांना पोटाच्या समस्या वारंवार होतात, अशा लोकांनी ड्रॅगन फ्रूटचा आहारात समावेश करावा.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते. व्हिटॅमिन सी हे त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. व्हिटॅमिन सी मुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत मिळते. त्यामुळे, अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी ड्रॅगन फ्रूट खाणे फायदेशीर ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Terrorist Attack: 5-6 गोळ्या चालवायचे थांबायचे अन् पुन्हा...; जम्मू बस अटॅकमध्ये जखमींनी सांगितली आपबिती

Ind vs Pak : सामन्यात टळली मोठी दुर्घटना! सिराजच्या 'त्या' बॉलवर थोडक्यात वाचला मोहम्मद रिझवान; डोक्यात...

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर

Sonakshi Sinha Wedding : शत्रुघ्न सिन्हा यांची लेक 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात; सोनाक्षीच्या लव्हस्टोरीसाठी सलमान कारणीभूत

IRCTC Password Recovery : IRCTC पासवर्ड विसरलात? चिंता करू नका, 'या' दोन सोप्या मार्गांनी करा रिकव्हर

SCROLL FOR NEXT