What Is Our Perfect Weight
What Is Our Perfect Weight sakal
लाइफस्टाइल

Health News : वयानुसार किती असायला हवे आपले वजन? तज्ञांकडून जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा

डॉक्टर असे म्हणतात की आपले वजन आपल्या उंची आणि वयानुसार असावे. शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त नसावे आणि वजन कमी करताना चरबी कमी करण्यावर आपण भर दिला पाहिजे. आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी अनेक आजारांना जन्म देते.

निरोगी जीवनशैली आणि कमी वजनाने आपण स्वतःला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो.आपल्या मनात अनेकदा प्रश्न येतो की आपल्या वयानुसार आणि उंचीनुसार आपले योग्य वजन किती असावे? परंतु उंचीनुसार वजनाचे कोणतेही निश्चित प्रमाण नाही. आपली जीवनशैली, शरीराचा प्रकार, दैनंदिन क्रिया यावरून आपले शरीराचे वजन ठरवीले जाते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण वय आणि उंचीनुसार हे कळत असलं तरी आपले वजन किती असावे, हे समजले तर आपण लठ्ठपणाशी संबंधित अनेक आजारांना टाळू शकतो.

डॉ. अरविंद अग्रवाल (श्री बालाजी ऍक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट, दिल्ली) यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, जर आपल्याला माहित असेल की आपले योग्य वजन किती असावे तर आपण ते सांभाळून लठ्ठपणा टाळू शकतो.

BMI (बॉडी मास इंडेक्स) पद्धत किती योग्य आहे?

BMI द्वारे उंचीनुसार वजन मोजता येते. समजा आपला BMI १८.५ पेक्षा कमी असल्यास आपले वजन कमी आहे. १८.५ ते २४.९ मधील BMI योग्य मानला जातो. ज्यांचे BMI २५ ते २९.९ आहे त्यांचे वजन जास्त आहे आणि ३० च्या वर BMI हे लठ्ठपणाचे लक्षण आहे.

डॉ. अभिषेक सुभाष म्हणतात, BMI ही वजन मापनाची 'चुकीची' संकल्पना आहे.

BMI कॅल्क्युलेटर कोणत्याही डॉक्टर किंवा जीवशास्त्रज्ञाने बनवलेले नाही तर ते एका गणितज्ञाने विकसित केले आहे. BMI च्या अनेक समस्या आहेत, जसे की ते स्नायूंच्या वस्तुमान, हाडांची घनता, एकूण शरीर रचना, वंश आणि लिंग यातील फरक लक्षात घेऊन वजन देत नाही. या प्रकारच्या कॅल्क्युलेटरपेक्षा लोकांनी त्यांच्या फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. लोकांनी त्यांचा आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप याकडे लक्ष दिले पाहिजे.

उंचीनुसार आपले आदर्श वजन किती असावे :

  • जर उंची ४ फूट १० इंच असेल तर आपले वजन ४१ ते ५२ किलो असावे.

  • उंची ५ फूट असेल तर आपले वजन ४४ ते ५५.७ किलो असावे.

  • उंची ५ फूट २ इंच असेल तर आपले वजन ४९ ते ६३ किलो असावे.

  • उंची ५ फूट ४ इंच असेल तर आपले वजन ४९ ते ६३ किलो असावे.

  • उंची ५ फूट ६ इंच उंचीच्या व्यक्तीचे वजन ५३ ते ६७ किलो असावे.

  • उंची ५ फूट ८ इंच असेल तर आपले वजन ५६ ते ७१ किलो दरम्यान असावे.

  • उंची ५ फूट १० इंच असलेल्या व्यक्तीचे वजन ५९ ते ७५ किलो दरम्यान असावे.

  • उंची ६ फूट असेल तर आपले वजन ६३ ते ८० किलो दरम्यान असावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT