Why Flies Enter House esakal
लाइफस्टाइल

Why Flies Enter House : पावसाळ्यात घरात माशांचा सुळसुळाट डोकेदुखी ठरतोय? तर या गोष्टींकडे लक्ष द्या!

माश्यांनी तुमच्या घरात घर केलं की त्यांना हाकलणं अशक्य होतं? हे उपाय करा

Pooja Karande-Kadam

Why Flies Enter House : आजकाल पावसामुळे प्रत्येकाच्या घरात एका पाहुण्याची भर होते. ते पाहुणे एकटे येत नाहीत तर सोबत अख्खी जत्राच घेऊन येतात. पावसाळ्यात घरात माशांची गर्दी होते. गोड पदार्थाचा वास, चिकट तेलकट भांडी यावर माशांची गर्दी असते.

घरी एखादे पाहुणे आले की त्यांच्यासाठी केलेल्या पदार्थांवरही माशांची जत्रा भरते. तेव्हा आपल्यालाच कसतरी होतं. अशावेळी माशा का होतात आणि त्यांना घरातून कसे बाहेर काढायचे याचे काही उपाय पाहुयात.

कुणाच्या तरी घरात डास प्रतिबंधक उपाय दिवसरात्र चालू असतात, त्यामुळे अनेक जण दिवसरात्र घराची फरशी पुसत असतात. पण अशा माशा आहेत ज्या जाण्याचे नाव घेत नाहीत. घरात का येतात हे तुम्हाला माहित असेल तर तुमची साफसफाईची पद्धतही बदलू शकते. चला तर मग जाणून घेऊया घरात माश्या का येतात? (Why Flies Enter House : why are flies coming into my room why are flies coming in my house)

'या' कारणांमुळे घरात येतात माश्या

एकदा माशा घरात आपली अंडी घालू लागल्यानंतर त्यांना तेथून हाकलून देणे कठीण होते. त्यामुळे माश्यांनी ज्या ठिकाणी आपली अंडी साठवून ठेवली आहेत. ती ठिकाणे शोधणे गरजेचे आहे. ही जागा घरातील पाळीव प्राण्यांच्या प्लेटवर साठवलेली उघडी डस्टबिन किंवा घाणेरडे अन्न देखील असू शकते. त्यामुळे आधी या जागा स्वच्छ करा.

पावसामुळे अशी अनेक गोष्टी वाहून जातात जिथे माशांनी अंडी घातलेली असतात.अशा वेळी अंडी घालण्यासाठी आणि योग्य जागा शोधण्यासाठी माश्या घरात प्रवेश करतात. योग्य जागा मिळताच ते अंडी घालतात. (Mosquitoes Home Remedies)

दारासमोर कचरा नकोच

आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा मुख्य दरवाजाजवळ कचराकुंडी असेल किंवा कचरा घराभोवतीच्या खिडक्या उघड्या असतील तर माश्यांना घरात प्रवेश करण्याचा मार्ग सुकर होतो. येथे माश्या सहज येतात आणि घरात येऊन अंडी घालतात.

खाद्यपदार्थांचे वास

अन्नाच्या वासामुळे फळे, मसाले, भाजीपाला, मिठाई इत्यादी खाद्यपदार्थ घरात उघडे ठेवले तर त्यांच्या वासाने माश्या अगदी सहज पणे घरात प्रवेश करतात. इतकंच नाही तर बडीशेपसारखे हर्बल सुगंधी मसालेही माश्यांना आकर्षित करण्याचं काम करतात.

या गोष्टी लक्षात घेऊन घराच्या स्वच्छतेकडे अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास माशा घरापासून दूर राहतील आणि त्यांचा प्रवेश रोखला जाईल.(Cleaning Tips)

घर स्वच्छ पुसून घ्या

  1. किचन ओटा तेलकट, चिकट राहणार नाही याची काळजी घ्या

  2. घरात येणारा गोड वासही माशांना आकर्षित करतो

  3. घरात ओल झाली तर ते वेळीच पुसून घ्या

  4. लहान मुलं सतत काहीही सांडत असतात त्याकडे लक्ष द्या

माशांना पळवायला हे उपाय करा

कापूर

कापूरचा वास खूप तीव्र असतो. त्यामुळे माशा या वासाने लगेच पळून जातात. कापूर वापरून तुम्ही घरच्या घरी स्प्रे बनवू शकता. कापूरचा स्प्रे बनवण्यासाठी 8-10 कापूरचे गोळे बारीक करून पावडर बनवा. आता या पावडरमध्ये एक ग्लास पाणी घालून स्प्रे बाटलीत भरा. जिथे जास्त माशा दिसतील तिथे या स्प्रे ने फवारणी करा.

तेल

माशी दूर ठेवण्यासाठी लॅव्हेंडर, निलगिरी, पुदीना आणि लेमनग्रास यांची तेल वापरली जातात. हे तेल त्यांच्या सुगंधासाठीच नव्हे तर माशांना दूर करण्यासाठी देखील वापरले जातात. या तेलाचे तुमच्या बेडरूममध्ये आणि किचनमध्ये शिंपडल्याने येथे माश्या येणार नाहीत.

लवंगाच्या तेलाच्या वासाने डास आणि माशा पळून जातात हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. तसेच लवंगाचे तेल खोबरेल तेलात मिसळून त्वचेवर लावल्यास ते ओडोमॉससारखे काम करते. (Home Remedies)

तुळशीची पाने

तुळशीच्या पानांचा सुगंध आल्याने माशा घरात येत नाहीत. तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर करून घरगुती स्प्रे बनवू शकता यामुळे माशा पळून जातील. घरच्या घरी तुळशीचा स्प्रे बनवण्यासाठी सुमारे 15 ते 20 पाने गरम पाण्यात उकळा किंवा भिजवा. आता हे पाणी एका स्प्रे बाटलीत भरून ठेवा व जिथे माशा जास्त बसतात तिथे तुम्ही याची फवारणी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT