Lips Care Tips
Lips Care Tips  esakal
लाइफस्टाइल

Lips Care Tips : फुटलेल्या ओठांना एका रात्रीत करा सॉफ्ट; केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्याची गरज नाही

सकाळ डिजिटल टीम

Lips Care Tips : दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागायला सुरू झाली आहे. हवेत अचानक गारठा वाढल्याने त्वचा कोरडी आणि निस्तेज वाटू लागलीय. थंडीत त्वचेची आद्रता टिकून राहत नाही त्यामूळे थंडीत ओठ फुटण्याची समस्याही जाणवू लागते. अशा परिस्थितीत अनेक महागडे लिप बाम देखील ओठांना मऊ बनवण्यात अपयशी ठरतात. त्यावर काही उपाय सापडत नाही.

कोरड्या,फुटलेल्या व रक्त येत असलेल्या ओठांमधून खुप वेदना होतात व त्रास होतो.फुटलेले ओठ तुमचे शरीर निरोगी नसल्याचे प्रतिनिधीत्व करीत असतात. शरीरात ‘ब’ जीवनसत्वाची कमतरता भासल्यानेही ओठ कोरडे पडतात.

एखाद्याला गोड स्माईल देताना, बोलताना, सेल्फी घेण्यासाठी पाउट करताना तुमचे ओठ खुप महत्वाची भूमिका बजावतात. तुमच्या मनातील भावना ओठांवर आल्यामुळे तुम्हाला मन मोकळे करता येते. ओठ आपल्या सौदर्यांत अधिकच भर घालतात.त्यामुळे त्यांची निगा राखणे देखील तितकेच आवश्यक आहे.

हिवाळ्यात वातावरणामूळे ओठांच्या मृत त्वचेच्या पेशी वाढू लागतात. त्यामूळे ओठ फुटतात. अशा परिस्थितीत केवळ लिप बामच्या मदतीने ओठ मऊ ठेवणे कठीण होते. म्हणूनच आम्ही तुम्हाला हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्याच्या काही टिप्स पाहूयात.

भरपूर पाणी प्या

थंडीत अनेकदा लोकांना तहान कमी लागते. अशा स्थितीत पाणी कमी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता तर होत. पण ओठही फुटू लागतात. दुसरीकडे, हिवाळ्यात भरपूर पाणी प्यायल्याने ओठांची आर्द्रता टिकून राहते आणि तुमचे ओठ मऊ राहतात. पाणी थोडे कोमट करूनही पिले तरी शरीरात उबदारपणा येतो. त्यामूळे पाणी पिण्याचे प्रमाण भरपूर ठेवा.

मध करेल मदत

आयुर्वेदात मधाला अधिक महत्त्व आहे. मध आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहे. हिवाळ्यात ओठ मऊ ठेवण्यासाठी तुम्ही मधाची मदत घेऊ शकता. मधामध्ये असलेले मॉइश्चरायझिंग घटक ओठांना पोषण देतात आणि मऊ ठेवतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर मध लावा आणि सकाळी अंघोळीच्या वेळी ओठ धुतले तरी चालतील.

ग्लिसरीन,गुलाबजलाचा वापर करा

ग्लिसरीन आणि गुलाबपाणी ओठांनाच नाही तर त्वचेलाही पोषण देते. त्वचा तजेलदारही बनवते. पण, तेच गुलाबजल ओठांच्या समस्येवरही गुणकारी आहे. रात्री झोपण्यापूर्वी ग्लिसरीन आणि गुलाबजल एकत्र करून ओठांवर लावा. यामुळे तुमचे ओठ मऊ आणि सुंदर दिसतील.

तूप आहे लाभदायक

ओठ मऊ करण्यासाठी तुम्ही देशी गायीच्या तूपाचा वापर करू शकता. अशा स्थितीत दररोज तुपाने मसाज केल्याने ओठांच्या त्वचेच्या मृत पेशी निघून जातील. मसाजमूळे ओठांचे रक्ताभिसरणही सुधरण्यास मदत होते. ज्यामुळे तुमचे ओठ गुलाबी आणि मुलायम होतील.

हे उपाय तूम्ही संपूर्ण हिवाळ्यात केले तर अधिक लाभदायक ठरतील. यामूळे एका रात्रीत फरक पडेलही. पण, थंडी इतकी त्रासदायक असेल की, पून्हा पून्हा ओठ फूटायला लागतील. त्यामूळे हे उपाय सतत करत रहा.

मोहरीचे तेल लावा

तुम्ही हिवाळ्यात मोहरीच्या तेलाचा वापर करून ओठ मऊ ठेवू शकता. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये मोहरीचे तेल लावावे. यामुळे हिवाळ्यात तुमचे ओठ अजिबात फुटणार नाहीत आणि ओठांचा मुलायमपणाही कायम राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanchanjungha Express Accident: बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात! प्रवाशांनी भरलेली कांचनजंगा एक्स्प्रेस मालगाडीला धडकली, ४ जणांचा मृत्यू

Sambhaji Nagar : पालकमंत्रिपदासाठी भाजप आग्रही;वरिष्ठांच्या भेटीसाठी प्रमुख पदाधिकारी थेट गाठणार मुंबई

Latest Marathi Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

MHT-CET Exam Result : ‘सीईटी’ निकाल पाहण्यास सर्व्हर डाउनचा फटका!

Praful Patel : विधानसभेत राष्ट्रवादीचा ८५ ते ९० जागांवर दावा; प्रफुल पटेल म्हणाले...

SCROLL FOR NEXT