Womens Day 2024 :  esakal
लाइफस्टाइल

Women's Day 2024: महिला दिनादिवशी पत्नीला करा खुश, गिफ्ट देऊन साजरा करा त्यांचा स्पेशल दिवस

या भेटवस्तू तिच्या अनेक कामी येतील

Pooja Karande-Kadam

Womens Day 2024 :

कसं असतं ना पतीने पत्नीला गिफ्ट देण्यासाठी एखाद्या विशेष वेळेची वाट पहायची नसते. मनात आलं की गिफ्ट द्यायचं असतं. आता या महिन्यात तुम्हाला तुमच्या बायकोला गिफ्ट द्यायचे असेल पण तुम्ही काहीतरी कारणाच्या शोधात असाल. तर काळजी करू नका. कारण या महिन्यात आठ तारखेला येणारा महिला दिन स्पेशल आहे.

या महिन्यात तुम्ही तुमच्या लाडक्या पत्नीला, प्रियसीला आकर्षक गिफ्ट देऊ शकता. आता दिवस तर ठरला पण भेटवस्तू द्यायची काय? असा प्रश्न पडला असेल. तर काळजी करू नका. आम्ही आहोत ना. आज आम्ही तुम्हाला पत्नीला किंवा लाडक्या आईला महिला दिनाची भेटवस्तू काय द्यायची याच्या काही आयडिया सांगणार आहोत.  (Womens day 2024)

हेडफोन्स

आजकाल सगळ्यांकडेच मोबाईल फोन असतो. पण हेडफोन्स प्रत्येकाकडेच असतील असे नाही. त्यामुळेच आई असो वा पत्नी सगळ्यांसाठी कामाची वस्तू असलेले हेडफोन्स तुम्ही त्यांना देऊ शकता. कारण आजकाल आई पत्नी स्वयंपाक करताना किंवा महत्त्वाचं काम करत असताना तिला याची गरज भासू शकते. तसेच पत्नीला नोकरीचे कॉल्स करण्यासाठी याची गरज भासू शकते.   

हेअर स्ट्रेटनर, स्टाईलिस्ट

प्रत्येक फंक्शनमध्ये आपण उठून दिसावं. प्रत्येकाने आपले कौतुक करावे असे प्रत्येकीलाच वाटते. अशातच तुम्ही जर पत्नीला हेअर स्टायलिस्ट अन् स्ट्रेटनर दिलात तर तिचा बराच वेळ वाचेल. तसेच कमी वेळात पार्लरमध्ये जाऊन आल्यासारखेच तिला तयार होता येईल.

स्मार्ट वॉच

आजकालच सगळं जगच स्मार्ट झालं आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक स्मार्ट वॉचही भेट देऊ शकता. बजेटमध्ये असताना तुम्ही सहज स्मार्ट घड्याळ मिळवू शकता. महिला दिनी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये तुमच्या पत्नीला काही द्यायचे असेल तर यापेक्षा चांगली भेट दुसरी असूच शकत नाही. (Womens day)

आयफोन

आयफोन स्वत:कडे असावा असे प्रत्येकालाच वाटते. कारण, तो फोन आपला स्टेटस काय आहे हे दाखवतो. त्यामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीला आयफोन देऊ शकता. यामुळे ती खूश होईल. आयफोनच बजेट नसेल तरी तुम्ही चांगला स्मार्टफोन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avian Influenza: देशात एव्हीयन इन्फ्लूएंझा व्हायरसची एन्ट्री! चिकन आणि अंडी विक्रीवर बंदी; 'हे' नियम पाळले नाहीत तर मोठा धोका

ती मला भेटायला का नाही आली? घराला कुलूप, अचानक झाली गायब; रजनीकांत यांचं ते प्रेम ज्याचा घाव आजही ताजा आहे

Pune Traffic Police : नववर्षाच्या रात्री पुण्यात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर धडक कारवाई; २०८ मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे!

Government Decision on Gig Workers : ‘गिग वर्कर्स’बाबत सरकारचा मोठा निर्णय! ‘Social Security Cover’सह बरच काही मिळणार मात्र...

Junnar Migratory Bird : युरोपातून येणाऱ्या रेड क्रेस्टेड पोचार्डची जुन्नर तालुक्यात प्रथमच नोंद; जैवविविधतेसाठी ऐतिहासिक क्षण!

SCROLL FOR NEXT