Women's Day 2024
Women's Day 2024esakal

Women's Day 2024 : ‘अजाणत्या वयात दूरच्या मामाने माझ्यावर बलात्कार केला, अन् मी…’

आई आणि वडिलांनी मिळून मला खूप मारहाण केली

Women's Day 2024 :

जागतिक महिला दिनाचा आठवडा आपल्याकडून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने आज आपण एक वेगळा अनुभव आलेल्या महिलेची कहाणी जाणून घेणार आहोत.

माझं नाव प्रिया मी महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक जिल्ह्यात राहते. मी गृहिणी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात लहानपणीच्या अनेक आठवणी असतात. पण माझ्या लहानपणाबद्दल मला आठवण यावी असं काहीच घडलेलं नाही.  

मी नववीत होते तेव्हाची गोष्ट. साधारण २००४ मधील. माझ्याच एका वर्गातील मुलाशी मी अभ्यासाबद्दल काहीतरी बोलत होते. शाळेच्या आवारातच होते मी. ते नेमकं माझ्या मोठ्या भावाने पाहिलं अन् घरी येऊन सांगितलं. घरच्यांनी मी जसं कोणाचा तरी हात धरून पळून जायचं म्हणतेय असा दंगा केला. घरच्यांनी मला बोलण्याची संधीही दिली नाही अन् माझं काहीही ऐकून  घेतलं नाही.  (Womens Day 2024)

Women's Day 2024
Womens Day 2023 : 'बाईपण' समजावून सांगणारे 10 चित्रपट, महिलादिनी आवर्जून पाहाच!

वडील फार कडक आणि तापट स्वभावाचे असल्यामुळे आई आणि वडिलांनी मिळून मला खूप मारहाण केली. कारण, भावाने अनेक प्रकारे वडिलांचे कान भरले होते. त्यामुळे वडिलांनी आधी माझी शाळा बंद केली. आणि नंतर बाहेर येणं जाणं बंद केलं. माझी काहीही चूक नसताना मला माझ्या मामांकडे पाठवण्यात आले. तिथे मामानी मामींनी मला कामासाठीच आयती मोलकरीन मिळाल्यासारखे कामाला लावले. त्यांनी भरपूर काम करून घेतली खाण्याच्या बाबतीतही माझे खूप हाल केले.

तिथे सहा महिने कसेबसे काढल्यानंतरची ही गोष्ट. तिथल्याच माझा एक नातेवाईक लांबचा मामा म्हणून आमच्या घरी नेहमी यायचा. त्याची नजर नेहमी माझ्यावर खिळलेली असायची. एकदा घरी कुणीही तो आला. अन् गोड गोड बोलू लागला. त्यानंतर त्याने माझ्यावरती जबरदस्तीचा प्रयत्न केला आणि माझा बलात्कार केला.

Women's Day 2024
Women's Day 2024 : ‘मी शारीरिक संबंधाला नकार दिला तर माझ्या नवऱ्याने..’;घटस्फोटाला धीटपणे सामोरे जाणाऱ्या तिची कहाणी

मी अवघी सोळा वर्षाचे होते. मला या गोष्टीचा खरंच त्यावेळी अर्थ काही कळला नाही. घरी सांगावे तर कुणाला सांगावे सगळे माझ्याशी बोलत नव्हते कोणीच माझं स्वतःचं असं हक्काचं नव्हतं ज्याला मी ह्या गोष्टी सांगू शकेल. मी काही सांगितलं असतं तरी परत मलाच वाईट ठरवण्यात आलं असतं. आणि सध्या माझ्याकडे आई-वडिलांच्या घरी सुद्धा राहायला जागा नव्हती त्याच्यामुळे मी कुणाला काहीच बोलले नाही.

अक्षरशः ही गोष्ट झाल्यानंतर दिवसभर मला इतकं ब्लीडिंग होत होतं की मी. घरातले जुने कपडे अस पॅड म्हणून वापरले. त्यानंतर पोटातही दुखत होते. हे दुखणे घेऊनच काम केले. मामींच्या लक्षात थोडा फार आलं होतं पण मी त्यांना सांगितलं की मला पाळी आली आहे. त्यानंतर तो मामा म्हणणारा नराधम पळून गेला.

Women's Day 2024
International Women's Day: महिला दिन स्‍नेहमेळाव्यात तनिष्‍कांचा सन्मान

या गोष्टीनंतर अचानक माझ्या मामांना माझी दया आली आणि त्यांनी दहावी मध्ये माझा ऍडमिशन करून घेतलं. एवढे सगळे कष्ट काढल्यानंतर मी खूप शिकले स्वतःच्या पायावरती उभे राहिले. आज माझा सोन्यासारखा संसार आहे घरात कशाचीही कमतरता नाहीये पण ही जी कडू आठवण माझ्या आयुष्यामध्ये आहे ती मनावरती एकदम कोरली गेलेली होती आणि मी ही कोणाशी शेअर करावी हे मला खरंच कळत नव्हतं.

Women's Day 2024
Women's Day : परगावात नोकरी करणाऱ्या महिलांना मुलांसह राहाण्यासाठी सरकार देणार जागा

लाखमोलाचा सल्ला

या प्रकरणावर ऍड.सुषमा पाटील म्हणतात की, लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक आत्याचारासाठीच पोक्सो (POCSO ACT) कायद्याची निर्मिती केली गेली आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने २०१२ साली तयार केलेला कायदा आहे. पोक्सो हे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेसचे लघुरूप आहे.

सदरील प्रकरणात संबंधित तरूणीने तिच्या विश्वासू लोकांना या घटनेची माहिती द्यायला हवी होती. कारण, तो व्यक्ती मोकाट आहे. त्याने तिच्यावरच नाही तर अन्य मुलींवरही अत्याचाराचा प्रयत्न केला असेल.

जर प्रिया या अन्यायाविरूद्ध बोलली असती तर त्या व्यक्तीचे असं कृत्य पुन्हा करण्याचे धाडस नसते झाले. अशा प्रकरणात कोर्टाकडून संबंधित बालकाला विशिष्ट रक्कमही देण्यात येते. जेणेकरून तिला या धक्क्यातून सावरण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com