womens day special
womens day special  esakal
लाइफस्टाइल

Womens Day special : ‘महिलांनो शरीराचे हाल करू नका, वेळीच ‘Silent killer’ ना ओळखा’

सकाळ डिजिटल टीम

आज ८ मार्च, आजचा दिवस हा भारतासह जगभरामध्ये जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. भारतात मुंबई येथे ०८ मार्च, १९४३ साली पहिल्यांदा जागतिक महिला दिवस साजरा केला गेला.

आजच्या महिला दिनाचे औचित्य साधून जगभरातील तसेच भारतातील अनेक विचारवंत, लेखक, लेखिका, सामाजिक व राजकीय लोकं, डॉक्टर, वकील यांनी विविध माध्यमांवर स्त्री- स्वातंत्र्य, शिक्षण, अन्याय-अत्याचार, आर्थिक सामाजिक पत, महिलांचे सबलीकरण अशा महिलांच्या विविध विषयांवर व्यक्त होणे फार महत्वाचे आहे.

भारतीय समाजव्यवस्थेमध्ये पुरुषप्रधान मानसिकता अद्यापही अस्तित्वात असल्यामुळे, महिलांकडे “क्षमता” असूनही केवळ “स्त्री” असल्यामुळे “तिला” नेहमीच दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे. प्रतिकूल परिस्थितीतही झाशीची राणी, जिजाऊ, ताराराणी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीमाई फुले, फातिमा शेख, रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी, इंदिरा गांधी, कल्पना चावला, प्रतिभाताई पाटील, जयललिता यांसह इतर अनेक स्त्रियांनी संधी मिळाल्यानंतर आपली “क्षमता” सिद्ध करून जगापुढे आदर्श ठेवलेला आहे.

एक स्त्री म्हणजे संघर्ष व त्यागाचं प्रतिक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण पोटात प्रसुतीच्या कळा सोसणारी, भ्रूण हत्या, वासनांध पुरुषांच्या घाणेरड्या नजरा, अन्याय अत्याचार, बलात्कार यांना बळी पडणारी समाजातील कोणी घटक असेल तर ती “स्त्री” च होय.

एक महिला डॉक्टर म्हणून महिलांच्या आरोग्याशी संबंधित आजार, प्रश्न व त्यावरील उपचार, उपाय यांवर बिनदिक्कतपणे व्यक्त होणे काळाच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. स्त्री हा कुटुंबातील सर्वात महत्वाचा घटक आहे. परंतु कुटुंबाची काळजी घेताना या महत्वाच्या घटकाचे स्वत:च्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष फार गंभीर बाब बनलेली आहे.

महिलांमध्ये थॉयराईडचं प्रमाण वाढत आहे

स्वातंत्र्यपुर्व काळापासून ते आजतागायत विशेषतः ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य हे गरोदरपण व बाळंतपण एवढ्यापुरतेच मर्यादित असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांच्या आरोग्याशी संबंधित शारिरीक व मानसिक आजारांमध्ये लक्षणीय वाढ होत असून, महिलांच्या आरोग्याचा सर्वांगीण विचार होणे ही काळाची गरज बनली आहे.

पी. सी. ओ. एस., थायरॉईड, अतिरिक्त लठ्ठपणा हे सर्व महिलांमध्ये आता भरपूर प्रमाणात दिसून येत आहे. ह्याबद्दल त्या पूर्ण अनभिज्ञ् आहेत. त्याचा प्रत्यय त्यांना तेव्हा येतो जेव्हा गर्भ राहत नाही. आणि मग सुरुवात होते ते IVF सारख्या ट्रीटमेंटची जी अत्यंत खर्चिक आहे, पण तो खर्च द्यायला त्या महिलेला काहीही वाटत नाही कारण ती अगदी हतबल झाली असते आणि तिला बाळ हवं असतं. पण हाच विचार जर आपण आधी केला, योग्य वेळी पाऊलं उचलली, योग्य आहार आणि व्यायाम केला तर कितीतरी गोष्टी साध्य होतील...!

महिलांनी योग आणि व्यायामाकडे दुर्लक्ष करू नये

हे असे आजार ज्यांची काही लक्षणं दिसत नाहीत ते तर अत्यंत वाईट. कारण ते पुढे जाऊन ‘Silent killer’ होतात. मग तेव्हा औषधांशिवाय पर्याय नसतो आणि अशी बरीच औषधं घेऊन ती संबंधित महिला एका डिप्रेसिव मोड मध्ये जाते.

ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रचंड स्ट्रेसफूल आहेत. आधुनिक काळातील बदलत्या जीवनशैलीमुळे उद्धभवणारे आजार आहेत हे सर्व. ह्या अशा आजारांना संतुलित आहाराद्वारे नियंत्रित ठेवण्यासाठी न्यूट्रिशन सायन्स वर आधारित संतुलित आहार, त्या संबंधित रेसिपी व योग्य सल्ला पुरवून तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य फिट ठेवण्यास मदत करणं हे एक ध्येय घेऊन आज तुमच्या समोर उभी आहे. मी अशी आशा करते हे सर्व तुम्ही मनावर घ्याल आणि त्याप्रमाणे पाऊलं उचलाल.

- न्युट्रिशनिस्ट डॉ. मृदूल कुंभोजकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT