World Sleep Day 2024 esakal
लाइफस्टाइल

World Sleep Day 2024 : झोप उडाली आकाशी; या टीप्स आजमवाल तर कुंभकर्णासारखी गाढ झोप लागेल

झोप येत नाही म्हणून तळमळणं बंद करा

सकाळ डिजिटल टीम

World Sleep Day 2024 :

आज 'वर्ल्ड स्लीप डे' आहे. दरवर्षी 17 मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो. बिझी लाईफस्टाईल आणि कामाच्या तणावामूळे अनेकांची झोप उडाली आहे. त्यामूळे सतत जागरण, सोशल मिडीया सर्फींग यामूळे आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या आहेत.

तूम्हाला फिट रहायचं असेल तर पुरेशी झोप घेण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. कारण, अनेकांना निद्रानाश आणि झोप न येण्याचा आजार झाला आहे. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्याचा वाईट परिणाम तरूण पिढीवर होत आहे.

अशा परिस्थितीत जर तुम्हालाही रात्री झोप येत नसेल. त्यामुळे काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही काही मिनिटांतच गाढ झोप घेऊ शकत नाही तर स्वत:ला निरोगीही ठेवू शकता.

तज्ज्ञांच्या मते, रात्री 6-8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच आम्ही तुम्हाला गाढ झोप घेण्याचे काही उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही दिवसभर ऍक्टीव्ह आणि उत्साही राहू शकता.

गाढ झोपलेलं बाळ सगळ्यांनाच आवडतं

मसाज करा

रात्री झोप येत असल्यास मसाज थेरपी वापरणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी तेलाने डोक्याला मसाज करा. ज्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि तुम्हाला लवकर झोप लागेल.

झोप येण्यासाठी अंघोळ

खरे तर कोमट पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील सर्व थकवा दूर होतो. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते. त्यामूळे झोप येण्यासाठी हा पर्याय सोपा आणि आरामदायक आहे.

शांत झोपेसाठी मसाज करा

पुस्तक वाचन करा

बऱ्याच जणाना असं वाटतं की ते वाचन करत असताना त्यांना जास्त झोप येते. काही विद्यार्थ्यांना अभ्यासाचे पुस्तक उघडले की त्यांना झोप येते. तूमची झोपेची तक्रार सोडवण्यासाठी आवडते पुस्तक वाचू शकता.

जेवणानंतर शतपावली करा

काही लोकांना जेवल्यानंतर लगेचच झोपायचं असतं. झोप नसली तरी ते लोळत पडतात, असे करणे तूम्हाला निद्रानाशाकडे घेऊन जाऊ शकते. त्यामूळे जेवण झालं की थोडावेळ शतपावली करा आणि मगच झोपा.

रात्रीचे वर्कआऊट नको

काही लोक तब्बेतीच्या बाबतील इतके जागरूक असतात. की ते रात्रच्या जेवणानंतरही वर्कआऊट करतात. पण, वर्कआऊट केल्याने शरीर ऍक्टीव्ह होते. त्यामूळे पुरेशी झोप येत नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: OUT or NOT OUT? ध्रुव जुरेलचा वादग्रस्त झेल; श्रीलंकन संघ करणार तक्रार... गॉलवर वेगळाच राडा Video Viral

Marathi News Live Updates : 'युती फक्त राज्यात' म्हणत पुणे महापालिका सभागृह नेते गणेश बीडकरांचा राष्ट्रवादीला थेट इशारा

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

SCROLL FOR NEXT