Hair transplant
Hair transplant esakal
लाइफस्टाइल

हेयर ट्रांसप्लांट करण्याकडे युवावर्गाचा कल अधिक डॉक्टर म्हणतात...

सुस्मिता वडतिले

प्रत्येकांच्या सौंदर्यामध्ये डोक्यावरील केसांमुळे एक वेगळी भर पडते. प्रत्येकाला आपले केस (Hairs) हे चांगले असावेत असे वाटते. या केसाचा थेट संबंध आपल्या सौंदर्याशी असतो. त्यामुळे प्रत्येक जण त्याची उत्तम निगा राखण्या बरोबरच त्याकडे कशा पद्धतीने अधिक लक्ष देता येईल याचाच विचार करतो. अलीकडच्या काळात केस गळती (Hair loss) ही एक मोठी समस्या बनली आहे. सध्या धावपळीच्या जीवनात अनेकांना स्वत:कडे पाहायलाही वेळ नाहीये. यामुळे अनेकांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्षही देता येत नाही. याबाबत डॉ. सर्वेश थत्ते 'सकाळ'शी बोलताना म्हणाले की, पहिल्यांदा हेयर ट्रांसप्लांट (Hair transplant) करत असाल तर न घाबरता तुम्ही त्वचारोगतज्ज्ञ (Dermatologist), तज्ञांचा सल्ला घेऊन यावर उपचार घेतले पाहिजे. याचे संभाव्य धोके इतके नाहीये. फक्त अशावेळी योग्य तज्ञांनी सांगितलेले उपचार केले तर काही घाबरण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या बहुतेकांना हेयर ट्रांसप्लांट बद्दलची माहिती असेलच. हेयर ट्रांसप्लांट (Hair transplant) ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये एक सर्जन म्हणजेच 'डर्माटॉलॉजिकल सर्जन' (Dermatologist) डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावर ट्रांसप्लांट (Transplant) करतात. अशावेळी योग्य तज्ञांकडे जाऊन उपचार घेतले पाहिजे. हेयर ट्रांसप्लांट केल्यानंतर तुम्हाला मेडिकल उपचार व्यवस्थित केले पाहिजे. केस गळण्याचे कारण तसे भरपूर प्रमाणात असतात. स्त्रिया आणि पुरुषांमध्ये ही केस गळण्याची वेगवेगळी कारणे आहेत. अनुवंशिक समस्या, ताणतणाव, हिमोग्लोबिनचे (Hemoglobin) प्रमाण, प्रदूषण (Pollution), संप्रेरकामधील बदल अशा विविध कारणांमुळे केस गळण्याचे किंवा टक्कल पडण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. हेयर ट्रांसप्लांट करुन घेण्यासाठी स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हेयर ट्रांसप्लांट करण्यासाठी सगळ्या प्रकारचे लोक तज्ञांकडे येतातच. परंतु पूर्वी 45- 50 वर्षे वयोगटातून येणारा वर्ग आता 25 ते 35 वयोगटातील येणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्याचे डॉ. थत्ते यांनी सांगितले.

यावेळी डॉ. सर्वेश थत्ते म्हणाले, हेयर ट्रांसप्लांट (Hair transplant) करणे सुरक्षितच असून, यावेळी जास्त घाबरण्याचे कारण नाहीयेय. परंतु ज्यांना सुरवातीपासून केस गळती असेल तर त्यांनी आधीपासूनच काळजी घेतली पाहिजे. पहिल्या स्टेजपासून काळजी घेतली तर काहीही होणार नाही. अशावेळी हेयर ट्रांसप्लांट करताना त्वचारोगतज्ज्ञाकडूनच (Dermatologist) उपचार करून घ्यावे. वाढते ताणतणाव, प्रदूषण, थायरॉईड अशा विविध कारणांनी टक्कल पडण्याचे किंवा केस गळण्याचे प्रमाण तरुणांमधील वाढले आहे. केस गळती कमी झाली नाही तर त्यावर शेवटचा पर्याय हा हेयर ट्रांसप्लांट असतो. हेयर ट्रांसप्लांट करतेवेळी त्वचारोगतज्ज्ञांची डिग्री तपासूनच सल्ला घ्या. DNB/MD/ DDVL/DVD यापैकी एक डिग्री नमूद असावी.

यावेळी डॉ. पूजा थत्ते म्हणाल्या, प्रत्येकाला आपले केस हे चांगले असावेत असे वाटत असते. या केसाचा थेट संबंध आपल्या सौंदर्याशी असतो. तसेच महिलांची अवेळी येणारी मासिक पाळी, लाइफस्टाइल (Lifestyle), वर्क लोड (Work Load), डाएट (Diet) वेळेवर आहे की नाही यामुळे ही केस गळती होऊ शकते. अशावेळी हेयर ट्रांसप्लांट करताना त्वचारोगतज्ज्ञाकडूनच उपचार करून घ्यावे.

पुरुषांची टक्कल पडण्याची कारणे

- अनुवांशिक कारणामुळे बहुतांश पुरुषांचे केस गळतात.

- वय वाढण्यासोबतच हॉर्मोन्समध्ये बदल होतात आणि टक्कल पडायला लागते.

- एखाद्या आजारपणामुळेही असे होऊ शकते.

- ताणतणावही केस गळण्याचे कारण असू शकते.

महिलांमध्ये टक्कल पडण्याची कारणे

- महिलांची अवेळी येणारी मासिक पाळी

- एखाद्या आजारपणामुळेही असे होऊ शकते.

- ताणतणावही केस गळण्याचे कारण असू शकते.

- लाइफस्टाइल, वर्क लोड, डाएट वेळेवर आहे की नाही यामुळे ही केस गळती होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT