Nandurbar Lok Sabha Constituency  esakal
लोकसभा २०२४

Nandurbar Lok Sabha Constituency : निकालाचे काऊंट डाऊन सुरू! भाजप-कॉंग्रेसच्या नेते -पदाधिकाऱ्यांमध्ये वाढली धकधक

Lok Sabha Constituency : एक्झिट पोलचे अंदाज मतदारसंघातील राजकीय विश्‍लेषकांचा अंदाज, मतदारांकडून येत असलेल्या प्रतिक्रिया यामुळे संदिग्ध वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : कधी नव्हे; इतक्या चुरशीच्या झालेल्या नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे तब्बल २१ दिवस प्रतीक्षा कराव्या लागलेला निकालाची तारीख आता केवळ दोन दिवसांवर आली आहे. जनतेची उत्सुकता तर शिगेला पोहचली आहे. मात्र खरी चुरस असलेल्या भाजप-कॉंग्रेसच्या नेते -पदाधिकारींमध्येही धकधक वाढली आहे.

कारण एक्झिट पोलचे अंदाज मतदारसंघातील राजकीय विश्‍लेषकांचा अंदाज, मतदारांकडून येत असलेल्या प्रतिक्रिया यामुळे संदिग्ध वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नंदुरबारचा खासदार कोण हा प्रश्‍न नंदुरबार लोकसभा मतदार संघातील जनतेचा मनात काहूर निर्माण करणारा आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यात चौथ्या टप्यात पार पडली.

मात्र देशातील अंतिम टप्पा १ जूनला संपला. त्यामुळे सर्व निवडणुका पार पडल्यावरच निकाल घोषित होणार आहे. यासाठी निवडणुकीनंतर नंदुरबार मतदारसंघातील जनतेला व उमेदवार आणि पक्षाचे नेते -कार्यकर्त्यांना तब्बल २१ दिवस निकालाची प्रतीक्षा करावी लागली आहे. या २१ दिवसाचे काऊंट डाऊन मतदानापासूनच सुरू झाले आहे.

मात्र जसजशी मतमोजणीची तारीख (४ जून)शी जवळ येत आहे. तसतसे काऊंट डाऊनची उत्सुकता वाढत आहे. राजकीय नेते, पदाधिकारीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही निकालाची उत्सुकता वाढली आहे. कारण यावेळी कॉंग्रेस-भाजपच्या उमेदवारांमध्येच लढत रंगली असून तीही अत्यंत चुरशीची होती. (latest marathi news)

भाजपने विकासाच्या मुद्यावर तर कॉंग्रेसने सामाजिक प्रश्‍न व रखडलेली विकास कामे आणि घराणेशाही यावर प्रचार केला. त्यात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेतली मात्र त्यांचे प्रभावी मुद्दे नंदुरबारसाठी काहीही नव्हते, तर कॉंग्रेसने प्रियांका गांधी यांची सभा घेतली. त्यांनी थेट इंदिरा गांधींपासून गांधी घराणे ते नंदुरबारच्या आदिवासी बांधवांचे नाते याविषयी आठवणींना उजाळा देत गोर-गरीब आदिवासींच्या प्रश्‍नांना हात घालत उपस्थितांची मने जिंकली होती.

तर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साहही शेवटपर्यंत दिसून आला. त्यानंतर भाजप मित्र पक्ष आणि अंतर्गत नाराजीचे सूर होते. त्यामुळे मतदान चांगले झाले असले तरी नेमके ते विकासाला मिळाले की नवीन विकासाचे स्वप्न दाखविणाऱ्यांना मिळाले, हे समजू शकलेले नाही. सध्या सुरू असलेल्या चर्चा, दोन्ही पक्षांकडून केले जाणारे विजयाचे जोरदार दावे, राजकीय विश्‍लेषकांचा अंदाज, एक्झिट पोलचे अंदाज अशी सर्व जुळवाजुळव याची गोळा बेरीज पाहता नेमके कोण नंदुरबारचे खासदार होतील असा प्रश्‍न आता जनतेला पडला आहे.

त्यामुळे जनतेकडून ४ जूनची काऊंट डाऊन सुरु झाली आहे. मात्र नेत्यांना तर निवडणुकीच्या निकालाची चर्चा झोप उडवणारी वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांचीही धकधक वाढली आहे. २१ दिवसांवरून अवघ्या दोन दिवसांवर निकालाची तारीख आली आहे. त्यातच नंदुरबार मतदारसंघाच्या निकालावर तर थेट अनेकांनी पैजा लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे पैजा लावणाऱ्यांनांही आता शेवटचे दोन दिवस बिकट वाटू लागले असून तेही काऊंट डाऊन करु लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT