Sangli Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : विशाल पाटलांवरील निलंबनाची कारवाई टाळली; शिवसेनेच्या दबावापुढे न झुकण्याची काँग्रेसने घेतली भूमिका!

विशाल पाटील यांनी बंडखोरी करू नये, यासाठी प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरून प्रयत्न केले जात होते.

सकाळ डिजिटल टीम

विशाल पाटील यांच्यावरील कारवाईला आमदार विश्‍वजित कदम यांनी विरोध केल्याचे समजते. सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आधीच प्रचंड नाराज व आक्रमक होते.

सांगली : सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघातून काँग्रेस आणि महाविकास आघाडी विरोधात बंडखोरी केल्याप्रकरणी प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. विशाल यांच्यावर कारवाईसाठी शिवेसना (Shiv Sena) ठाकरे पक्षाने दबाव आणला होता, मात्र त्यापुढे न झुकण्याची भूमिका काँग्रेसने (Congress) घेतली आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांचे काँग्रेससाठीचे योगदान, विशाल यांच्या बंडामागची भूमिका, भविष्यातील सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांचे गणित आणि विशाल यांच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची अपेक्षा, ही त्याची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हेही कारवाईबाबत फारसे आग्रही नसल्याचे चित्र समोर आले आहे. आता निवडणूक संपल्याने तो विषयही गुंडाळला आहे.

विशाल पाटील यांनी बंडखोरी करू नये, यासाठी प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरून प्रयत्न केले जात होते. ‘सांगलीत बंडखोरी झाल्यास त्याचे राज्यभर पडसाद उमटतील,’ असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाने दिला होता. त्यामुळे काँग्रेस सावध होती. विशाल यांना राज्यसभा आणि विधान परिषद सदस्यत्वाची ऑफरदेखील आमदार विश्‍वजित कदम यांच्या माध्यमातून देण्यात आली होती.

विश्‍वजित यांच्या माहितीनुसार, थेट खासदार राहुल गांधी यांनी तसा शब्द दिला होता; परंतु विशाल यांनी, ‘हे बंड काँग्रेसचेच आहे,’ असे सांगत उमेदवारी कायम ठेवली. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल, असे संकेत मिळत होते. कोल्हापूर येथील बंडखोर बाजीराव खाडे यांचे निलंबन करण्यात आले. ते काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय असताना त्यांच्यावर कारवाई केली. त्यामुळे विशाल यांच्यावरही कारवाईची शक्यता वर्तवली गेली होती.

प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगली दौऱ्यात याबाबत वाच्यता केली. ‘सांगलीतील स्थितीचा अहवाल राष्ट्रीय समितीकडे पाठवेन, तेथून आदेश आल्यानंतर कार्यवाही केली जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी विशाल यांच्यावर कारवाईसाठीचा नव्हे, तर सांगलीतील परिस्थितीचा अहवाल पाठवण्याचे सूतोवाच करून त्यांची भूमिका आधीच स्पष्ट केली होती. तसेच घडले. विशाल यांच्यावर कारवाई टाळण्यात आली.

विश्‍वजित यांचा कारवाईला विरोध

विशाल पाटील यांच्यावरील कारवाईला आमदार विश्‍वजित कदम यांनी विरोध केल्याचे समजते. सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आधीच प्रचंड नाराज व आक्रमक होते. विशाल यांनी हे काँग्रेसचे बंड असल्याचे जाहीर केले. तेव्हा, कारवाई करून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना अधिक दुखावल्या जाऊ नयेत, याची काळजी घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS U19: ज्युनियर सेहवाग अर्धशतकापासून हुकला, अन्वय द्रविड्हचीही बॅट शांत; यशवर्धन चौहानने मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं शतक

Walchandnagar News : बुलेटच्या सायलेन्सर वरुन फिरविला रोलर....; पोलिसांनी बुलेटचा फट् -फट् आवाज केला बंद...

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

SCROLL FOR NEXT