Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency esakal
लोकसभा २०२४

'श्रीकांत शिंदेंना विरोध करणारे वाघ गेले कुठे? आता त्यांना शोधण्याची वेळ आलीये'; उदय सामंतांची टोलेबाजी

सकाळ डिजिटल टीम

घरापर्यंत याल तर माझ्याकडेही तुमची जंत्री आहे. जे संस्कार विसरलेत त्यांनी आम्हाला संस्कार शिकवू नयेत.

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या विरोधात निवडणूक लढण्याच्या डरकाळ्या फोडणारे वाघ गेले कुठे? त्यांना आता शोधण्याची वेळ आली आहे. असंतुष्ट महाविकास आघाडीला अजून पंतप्रधानपदाचा उमेदवार सापडलेला नाही, त्यांचे भवितव्य या निवडणुकीत काय आणि त्यांना दुसऱ्याबद्दल बोलण्याचा अधिकार काय? अशी टोलेबाजी करत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उबाठा शिवसेना आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) चिमटे काढले.

विवेक हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरील (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency) दावा आजही आम्ही सोडलेला नाही. मात्र, प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. घाबरून उमेदवारी मागे घेतली, अशा आवया उठविण्यात आल्या. मात्र, मी कोणाच्याही धमकीला घाबरत नाही. आमचा विषय सोडविण्यात आम्ही सक्षम आहोत. दुसऱ्यांनी लुडबुड करण्याची आवश्यकता नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, कल्याणमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे एका महिलेला उमेदवारी दिली आहे. त्या महिलेचे आम्ही कौतुक करतो. मात्र, आमच्यासमोर जे उमेदवार देताय ते उमेदवार निदान सक्षम आणि तुल्यबळ तरी द्या, असा खोचक टोला सामंत यांनी लगावला. वैयक्तिक टीकेवर कोणी येऊ नये. घरापर्यंत याल तर माझ्याकडेही तुमची जंत्री आहे. जे संस्कार विसरलेत त्यांनी आम्हाला संस्कार शिकवू नयेत.

राणेंच्या भेटीची चर्चा

राणेंची मी भेट घेतली त्याचीदेखील चर्चा झाली. परंतु, या भेटीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे, या दृष्टीने काम करण्याचा निर्णय झाला. या सर्व घडामोडीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता भरडला जातो. त्या भावनेतून ट्विट केले होते; परंतु त्याबाबत आम्ही लगेच खुलासा केल्याचे सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीच्या भल्यासाठीच निर्णय

गुवाहटीला जाण्याचा जो निर्णय घेतला तो रत्नागिरीच्या भल्यासाठीच घेतला. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी आजवर जेवढा निधी मिळाल नसेल तेवढी विकास कामे दिली. त्यामुळे अशा व्यक्तीला मोठे करण्याची जबाबदारी आपली आहे, असेही सामंत म्हणाले.

टीका करणे ही संस्कृती नाही

दुसरे टीका करतात म्हणून आपण टीका करणे ही आपली संस्कृती नाही. कारण आपल्याला आपली ताकद माहिती आहे. आपल्याला अन्याय सहन होत नाही. २००५ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना आमच्या नगरसेवकांवर अन्याय होत होता. परंतु आम्ही काय करू शकतो, हे तेव्हा दाखवून दिले. १४ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देऊन अशोक मयेकर यांना नगराध्यक्ष केले तर बशिर मुर्तुझा उपनगराध्यक्ष झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT