Eknath Shinde  
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भ्रष्टाचारी माणूस", आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे कारवाईची मागणी

Sandip Kapde

युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तीन घोटाळ्यांची माहिती राज्यपालांना दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले.

गेल्या सात-आठ महिन्यात प्रशासकाच्या अंधाधुंदी कामामुळे मोठे घोटाळे होते. बिल्डर कॉन्ट्रक्टरच्या सरकारने मुंबईत सहा हजार कोटींचा रस्त्याचा घोटाळा केला आहे. अनेक नगरसेवकांनी याबाबत तक्रार केली आहे. मात्र कारवाई करण्यात आली नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील सध्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहेत. मी त्यांना चर्चेला येण्यास सांगितले. मात्र ते येत नाहीत आहेत. ते कधी शेतात तर कधी गुवाहाटीला पळून जातात.

१६० कोटींची कामे २६३ कोटींना दिल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील काँक्रिटीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळच्या लोकांना कंत्राट दिले आहे, याची चौकशी करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT