Aditya Thackeray Astrology  sakal
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray Astrology : आदित्य ठाकरेंचं 'या' वर्षी लग्न होणार? ज्योतिषी काय म्हणाले, वाचा

आदित्य ठाकरे यांच्या ग्रहस्थितीनुसार 2023 हे वर्ष त्यांच्या जीवनातील आक्रमक वर्ष ठरेल.

सकाळ डिजिटल टीम

Aditya Thackeray Astrology : नवीन वर्ष राज्यातील राजकारणांसाठी कसं जाणार याची उत्सूकता सर्वांनाच असते. कधी राजकीय गोष्टी तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे राजकारणी कायमच चर्चेत असतात. आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंविषयी जाणून घेणार आहोत.

आदित्य ठाकरे यांचं वैयक्तिक आयुष्य असो की राजकीय जीवन असो, कायमच चर्चेत असतं.  महंत अनिकेतशास्त्री देशपांडे (अधिपती- महर्षी पंचायतन सिद्धपीठम्) यांनी आदित्य ठाकरेंविषयी काही महत्त्वाचे खुलासे करत त्याचं नवीन वर्ष कसं जाणार, याविषयी सांगितलयं. (Aditya Thackeray Astrology how will be a new year for him )

महंत अनिकेतशास्त्री देशपांडे म्हणाले, "आदित्य ठाकरे यांच्या ग्रहस्थितीनुसार 2023 हे वर्ष त्यांच्या जिवनातील आक्रमक वर्ष ठरेल. कोर्ट- कचेरी, प्रशासकीय कार्यवाही याला त्यांना सामोरे जावे लागेल. त्यांना नाण्याच्या दोन बाजुंप्रमाणे एका बाजुने यश तर दुसऱ्या बाजुने निराशाजनक अपयश पाहावे लागेल.

त्यांच्या नेतृत्वामुळे काही ठिकाणी पक्षालादेखील अपयश पाहावे लागेल. एकूण संमिश्र फल 2023 मध्ये आदित्य ठाकरेंना प्राप्त होणार आहे. "

पुढे म्हणाले, "यासह येत्या नविन वर्षात शुभमंगल घटना विशेषकरून त्यांच्या आयुष्यात घडेल. यात त्यांचा विवाह योगही उत्तम जुळून येऊ शकतो.

मकर संक्रांतीपासून त्यांच्यावर आरिष्ट असून ते एप्रिल पर्यंत असेल. मात्र त्यानंतर शनि, गुरु ग्रह पालट झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात शुभ संकेत प्राप्त होतील."

महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच विवाह योग जुळून आला तर या वर्षी आदित्य ठाकरेंचं लग्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच जर त्यांच्या वाटेला यश आले तर पक्षाला तर फायदा होणारच पण जर अपयश आले तर पक्षाला कोणतं नुकसान होऊ शकतं, याकडेही सर्वांची नजर असणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT