Colleges Admission News esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra News : अभियांत्रिकी, ‘एमबीए’ला सुगीचे दिवस; 80 टक्क्‍यांहून अधिक जागांवर प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra News : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू असून, काही शिक्षणक्रमांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पदवीच्‍या स्‍तरावर अभियांत्रिकी, तर पदव्‍युत्तर पदवीच्‍या स्‍तरावर ‘एमबीए’ या अभ्यासक्रमाला सुगीचे दिवस आल्‍याचे आकडेवारीतून स्‍पष्ट होते.

या अभ्यासक्रमांना राज्‍यस्‍तरावरील ८० टक्क्‍यांहून अधिक जागांवर प्रवेश झालेले आहेत. दुसरीकडे कृषी पदवी अभ्यासक्रमाच्‍या २५ टक्‍के आणि पाच वर्षे एलएल.बी. अभ्यासक्रमाच्‍या सुमारे ३५ टक्‍के जागा रिक्‍त राहिल्‍या आहेत. (Admission to more than 80 percent seats across state in engineering and mba maharashtra news)

इयत्ता बारावी, पदवी अभ्यासक्रमाच्‍या आधारे अनुक्रमे पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रक्रिया राबविण्यात आली. सध्या काही अभ्यासक्रमांची प्रक्रिया अंतिम टप्‍यात असली, तरी काही अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश फेऱ्या पूर्ण झालेल्‍या आहेत. प्रक्रिया पूर्ण झालेल्‍या अभ्यासक्रमांना मिळालेला प्रतिसाद आकडेवारीतून स्‍पष्ट होत आहे.

राज्‍यस्‍तरावर पदवीच्‍या पातळीवर अभियांत्रिकी (बी.ई./बी.टेक.) अभ्यासक्रमाच्‍या ८१ टक्‍के जागांवर प्रवेश झाले. पदव्‍युत्तर पदवी स्‍तरावरील अभ्यासक्रमांचा विचार केल्‍यास ‘एमबीए’च्‍या ८४.१३ टक्‍के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविले.

दुसरीकडे कृषीच्‍या पदवी अभ्यासक्रमांच्‍या ७४.७० टक्‍के जागांवर प्रवेश झालेले असून, उर्वरित जागा रिक्‍त आहेत. शिक्षणशास्‍त्र शाखेतील बी.ए./बी.एस्सी.-बी.एड. या संयुक्‍त अभ्यासक्रमालाही अल्‍प प्रतिसाद मिळाला असून, अवघ्या २६.५० टक्‍के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अभ्यासक्रमनिहाय उपलब्‍ध जागा व प्रवेशाची आकडेवारी अशी ः

अभ्यासक्रम उपलब्‍ध जागा झालेले प्रवेश रिक्‍त जागा

अभियांत्रिकी (बी.ई./बी.टेक.) १ लाख ४५ हजार ४८४ १ लाख १७ हजार ६५१ ३६ हजार ००४

एमबीए १३ हजार १२३ ११ हजार ०४१ २ हजार ०८२

हॉटेल मॅनेजमेंट (पदवी) ६७२ २३५ ४३७

बी.ए./बी.एस्सी., बी.एड. ४५३ १२० ३३३

एलएल.बी. (५ वर्षे) १२ हजार ४२३ ८ हजार ००८ ४ हजार ४१५

कृषी पदवी १५ हजार ६२३ ११ हजार ६७० ३ हजार ९५३

फाईन आर्ट पदवी ७६६ ६२६ १९१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT