Shivsena  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता ठाकरे गटाचं मशाल चिन्हही धोक्यात?

एका धक्क्यातून ठाकरे गट सावरत असतानाच आता मशाल चिन्ह देखील धोक्यात येण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली असून आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

तर निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल या चिन्हाचाच वापर करावा लागणार आहे. मात्र या चिन्हाबाबत ठाकरे गटाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं मशाल चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी समता पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. आज सकाळी 10 वाजता समता पक्षाचे शिष्टमंडळ याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आहे. समता पक्षाचे अध्यक्ष उदय मण्डल यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहे.

काल (शुक्रवारी) निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला मशाल चिन्हाचा वापर करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र आता मशाल या चिन्हावर समता पक्षाने आपला दावा सांगितल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. आज सकाळी दहा वाजता याच पार्श्वभूमीवर समता पक्षाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे जाणार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT