MLA Vinayak Mete Accident Death
MLA Vinayak Mete Accident Death esakal
महाराष्ट्र

मेटेंच्या निधानानंतर 'शिवसंग्राम'चं काय होणार? प्रदेशाध्यक्ष म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि मराठा समाजाचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर आता शिवसंग्राम संघटनेचं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण याबाबत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी पुढील रणनीती काय असेल याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. (After Vinayak Mete what about ShivSangram Sanghatna Tanaji Shinde gives Info)

शिंदे म्हणाले, पत्रकार परिषद घेताना दुःख होत आहे की विनायक मेटे यांचे अपघाती निधन झालं. संपूर्ण परिवार दुःखात आहे. शिवसंग्राम संघटनेनं जे प्रश्न घेतले होते ती जबाबदारी आता आमच्या खांद्यावर आहे. मराठा आरक्षण, शिवस्मारका सारखे प्रश्न मार्गी लागले तर त्यांना खरी श्रद्धांजली वाहिली जाईल. मात्र अपघाती निधन होणं ही सर्व साधारण बाब नाही. मेटे यांच्या अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लोकांना दुःख झालेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात शोक सभा सुरू आहेत. आमची मागणी आहे की ही चौकशी निःपक्षपणे झाली पाहिजे.

२४ ऑगस्ट रोजी विनायक मेटेंसाठी आदरांजली सभा मुंबईत होईल. या सभेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते उपस्थितीत राहतील. मेटेंना सत्तेत घेण्यासाठी आम्ही भाजपकडे प्रयत्न करत होतो. शिवसंग्रामच्यावतीने ज्योती मेटे यांनी विधानपरिषदेत संधी द्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि भाजपकडे आमचे शिष्ट मंडळ लवकर करेल, अशी माहिती यावेळी शिंदे यांनी दिली.

सध्या दुखवटा सुरु आहे तो संपला की राज्य कार्यकारणीची बैठक बोलावून संघटनेची पुढची दिशा ठरवली जाईल. कोणत्याही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकबाजी किंवा स्टेटमेंट देऊ नये असे निर्देशही आम्ही दिले आहेत. मेटे यांच्या भाच्याने ड्रायव्हरवर आरोप केले आहेत. त्यांना असं विधान करण्याची कुठलीही परवानगी संघटनेकडून नव्हती, मात्र तो भावनेच्या भरात बोलून गेला असावा. आमचा नेता गेला आहे. अपघात झाल्यावर त्यांना लवकर मदत मिळावी अशी आमची भावना होती. घातपात म्हणायला आमच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT